गावगाथा

एम के फाउंडेशन कडून पोलिस पाटील दिनानिमित्त पोलीस पाटलांचा सन्मान :एमके फाउंडेशन कडून आईची भुमिका निभावली जाते पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे

एम के फाउंडेशन गरजवंताच्या दारापर्यंत जावून आईचीच भुमिका निभावत असल्याचे प्रतिपादन मंद्रुपचे पोलिस उपनिरीक्षक अमितकुमार करपे यांनी केले.

एम के फाउंडेशन कडून पोलिस पाटील दिनानिमित्त पोलीस पाटलांचा सन्मान :एमके फाउंडेशन कडून आईची भुमिका निभावली जाते पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे

HTML img Tag Simply Easy Learning    

….
बसवनगर: पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे
….
एम के फाउंडेशन गरजवंताच्या दारापर्यंत जावून आईचीच भुमिका निभावत असल्याचे प्रतिपादन मंद्रुपचे पोलिस उपनिरीक्षक अमितकुमार करपे यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

बसवनगर (ता. दक्षिण सोलापूर ) येथे दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील पोलीस पाटील यांचे तुळशी रोप आणि प्रमाणपत्र देऊन पोलीस पाटील दिनानिमित्त आयोजित सत्काराच्या वेळी पोलीस उपनिरीक्षक श्री. करपे बोलत होते. यावेळी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनूरे, पोलिस उपनिरीक्षक अमितकुमार करपे, भाजपायु.मो.चे जिल्हा उपाध्यक्ष बनसिध्द वडरे, श्रीकांत भरले, बिरप्पा बिराजदार, रोहिणी पवार, श्रीशैल पाटील, लक्ष्मीपुत्र आंदेवाडी, विजय बावकर, रेहमान अतार, संतोष बनसोडे, सविता येळमेले, रेश्मा पठाण, श्रीदेवी कोळी, लक्ष्मीबाई बनसोडे, वैशाली मोरे, लालबी हन्नूरे, विजय गावडे, निसार आतार, आमसिध्द सलगरे, सैपन बेगडे, धर्मराव कोळी.

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री. कोगनूरे म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकाच्या संपर्कात राहून शासन आणि समाज यांच्यातील दुवा म्हणजेच पोलीस पाटील आहेत. अशा घटाकाचा गौरव करण्याचा प्रयत्न केला. मी सुध्दा गरीबीचे चटके सोसलेला आहे. शिक्षणाशिवाय समाजाचा प्रगती शक्य होणार नाही. हे जाणून मी विद्यार्थ्यांच्या दारात जात आहे. शेवटच्या क्षणापर्यंत समाजाच्या ऋणात राहीन.

HTML img Tag Simply Easy Learning    

अमितकुमार करपे म्हणाले की, पोलिसांचे खरे कान डोळे पोलिस पाटील आहेत. कोव्हीडसारख्या काळात पोलिस पाटील यांचे काम उल्लेखनीय ठरलेला आहे. एमके फौंडेशनचे काम गरजवंताच्या दारापर्यंत जाते. तळागाळातील लोकांचे आश्रु पुसण्याच काम ते करतात. आई सारखेच काम या फौंडेशनकडून सुरू आहे. सुत्रसंचालन उषा बामणे तर आभार बनसिध्द वडरे यांनी केले.अशोक पुजारी ,रहेमान अतार,आदींचेही यावेळी भाषण झाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकांत चांदोंडे तर सूत्रसंचालन उषा बामणे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक पुजारी,सैपन बेगडे,विजय गावडे, धर्मराज कोळी,कुमार बगले,नागनाथ उंबरजे तुकाराम काटकर तसेच फाउंडेशनचे पदाधिकारी संचालक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते..

HTML img Tag Simply Easy Learning    

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button