गावगाथा

विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न…

सत्कार सन्मान सोहळा

विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न…

गणेश हिरवे…मुंबई प्रतिनिधी…शिवसेना उबाठा शाखा क्रमांक ७० च्या वतीने नुकताच विलेपार्ले पश्चिम येथील अमृतबाग हॉल मध्ये दिनांक १३ जुलै २०२४ रोजी इयत्ता दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार माजी परिवहन मंत्री, विभागप्रमुख आमदार ऍड अनिल परब, विधानसभा संघटक संजय कदम, विधानसभा समन्वयक सुनील जैन खाबीया यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपविभाग प्रमुख गणपत महाडिक, रिजनल एज्युकेशन ऍण्ड डेव्हलपमेंट अधिकारी प्रमोद मून, सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे, माजी सैनिक चंद्रशेखर सावंत, आदी प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्याना फोल्डर आणि चांगल्या प्रतीच्या पाणी बॉटल देऊन गौरविण्यात आले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ठामपणे चालणाऱ्या आणि शेवट पर्यंत उद्धव ठाकरे यांचे सोबत राहणाऱ्या निष्ठावान शिवसैनिकांचा देखील सन्मान करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे प्रदीप मून, काँग्रेसचे स्थानिक नेते मेहुलभाई व्होरा, वंदना महाडिक, गणेश हिरवे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी बृहनमुंबई मनपा शाळेत सलग ३० वर्ष सेवा करून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या संज्याव रोजारिओ सरांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला.गरजूंना व्हील चेअर देण्यात आली. शाखाप्रमुख आनंदा चव्हाण, सिन्नर सहसंपर्क प्रमुख प्रसाद नागावकर, शाखा संघटक उषाताई सावंत, अपूर्वा सावंत, उपशाखा प्रमुख गणेश महाडिक, शिव माथाडीचे जिग्नेश राठोड, माजी सैनिक चंद्रशेखर सावंत आदी मान्यवर हजर होते.शेवटी उबाठा माजी शाखा युवाअधिकारी आणि कार्यक्रमाचे आयोजक सुनील महाडिक यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था साईनाथ मित्र मंडळाने केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button