गावगाथा

स्पर्धेच्या युगात वाटचाल करीत असताना मुलींनी सक्षमपणे स्वत: च्या पायावर उभे राहण्यासाठी ब्युटी पार्लर सारखे कोर्सेस करून व्यवसाय सुरू करणे आवश्यक : शोभाताई खेडगी

साज ब्युटी पार्लर सोलापूरच्या श्वेता लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या सदर कोर्ससाठी एकूण ५५ विद्यार्थिनीं सहभाग नोंदविला होता. त्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेच्या युगात वाटचाल करीत असताना मुलींनी सक्षमपणे स्वत: च्या पायावर उभे राहण्यासाठी ब्युटी पार्लर
सारखे कोर्सेस करून व्यवसाय सुरू करणे आवश्यक : शोभाताई खेडगी

अक्कलकोट, दि. २०- स्पर्धेच्या युगात वाटचाल करीत असताना मुलींनी सक्षमपणे स्वत: च्या पायावर उभे राहण्यासाठी ब्युटी पार्लर
सारखे कोर्सेस करून व्यवसाय सुरू करणे आवश्यक  असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालिका तथा
माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी यांनी केले.

येथील सी.बी. खेडगी महाविद्यालय आणि गर्ल्स कौन्सिलिंग सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाविद्यालयातील मुलींसाठी नुकताच बेसिक ब्युटी पार्लर सर्टिफिकेट कोर्स संपन्न झाला.या कोर्सचा समारोप समारंभ आणि कोर्स मधील यशस्वी मुलींच्या सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या. यावेळी

म्हणाल्या की, मुलींनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अभ्यासाबरोबरच व्यवसाय प्रशिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभे राहणे काळाची गरज आहे. त्याकरीता यासारखे
अगदी कमी भांडवलाचे
कोर्सेसची व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेऊन करिअर करण्याचे आवाहन केले.

प्राचार्य डॉ. आडवीतोट यांनी मुलीनी केवळ एवढ्याच बेसिक कोर्सवर न थांबता पुढे अडव्हांस कोर्स करून भविष्यात आदर्श गृहिणी बरोबरच करिअरच्या दृष्टिकोनातून याकडे पाहावे, असे सांगितले.

प्रास्ताविक भाषणात
गर्ल्स कौन्सिलिंग सेलच्या समन्वयक प्रा. संध्या इंगळे यांनी आपल्या नव्या बदलत्या जगात जिथे या क्षेत्रात करिअरच्या प्रचंड संधी आहेत. हा एक कोर्स संधी समजून त्याचे सोने करा, असे सांगितले.
हा कोर्स
साज ब्युटी पार्लर सोलापूरच्या
श्वेता लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या सदर कोर्ससाठी एकूण ५५ विद्यार्थिनीं सहभाग नोंदविला होता. त्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता अनंतपुरे तर आभार प्रदर्शन विजयालक्ष्मी कुंभार यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. शितल बहिर्जी प्रा.प्रीती चव्हाण, प्रा .प्रियंका पाटील, प्राजक्ता पोतदार, सारिका गजधाने, अदिती सावळी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button