गावगाथा

*निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग कवी संमेलन*

कवी संमेलनात संपादक योगेश हरणे यांचे *सुखाची सावली* या प्रतिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले

*निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग कवी संमेलन*

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रतिनिधी पुणे – काव्ययोग काव्य संस्था, पुणे आयोजित पुण्यापासून बाहेर निसर्गात पहिले ” निसर्ग कवी संमेलन” आनंदाच्या वातावरणात, निसर्गरम्य ठिकाणी, बनेश्वर तीर्थस्थानी, बनेश्वर कृषी पर्यटन येथे निसर्ग कवी श्री लक्ष्मण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली. पार पडले. या कविसंमेला कवींचा भरपूर प्रतिसाद मिळाला . बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर या ठिकाणीवरुन ७० कवींची लक्षणीय उपस्थिती होती. कवी संमेलनाला उद्घाटक म्हणून ऍड विजयकुमार कस्तुरे, विशेष उपस्थिती सौ संगीता गुरव उद्योजिका, प्रमुख उपस्थिती प्रतिमा काळे लेखिका, दशरथ धायगुडे कवी, धनंजय इंगळे कवी उपस्थित होते. बालभारती प्रकाशित किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक श्री किरणजी केंद्रे सर यांनीही या कवी संमेलन भेट देऊन उपस्थित कवींना मार्गदर्शन केले.
काव्य योग काव्य संस्था पुणेचे अध्यक्ष श्री योगेश हरने यांनी या कवी संमेलनाचे आयोजन केले होते गौरव पुंडे, शैलेश सुतार, श्रीराम घडे, प्रमोद सूर्यवंशी या तरुण साहित्यिकांनी हे कवी संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक श्री किरणजी केंद्रे सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, किशोर मासिक हे लहान मुलांसाठी प्रेरणादायी असून या मासिकात कविता ह्या फक्त लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रकाशित केले जाते. लहान मुलांच्या प्रेरणादायी असतील अशाच कविता किशोर मासिकांमधून प्रकाशित केल्या जातात किशोर मासिकासाठी येणाऱ्या अनेक कवितांमधून निवडक कविता किशोर मासिका मध्ये प्रकाशित करण्याचा आमचा मानस असतो.
श्री लक्ष्मण शिंदे, निसर्ग कवी यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, कवीसंमेलनेही शहरात न होता निसर्गरम्य ठिकाणी, निसर्गाच्या सानिध्यात अशी कवी संमेलन आयोजित केली जावी. त्यामुळे ग्रामीण भागाचा ढंग, ग्रामीण भागातील कविता, ग्रामीण भागातील जनजीवन कवींना समजून यावे आणि ग्रामीण भागातील लोकांना कवितेचा लळा लागावा यासाठी निसर्गातच कवी संमेलन व्हावे याकरिता माझा कायम प्रयत्न राहील.
एकूणच पहिलेच निसर्ग कवी संमेलन यशस्वी झाल्याचा आनंद आयोजक, नियोजक आणि उपस्थित असलेल्या कवींच्या भावनांमधून दिसून येत होता. या कवी संमेलनासाठी बनेश्वर कृषी प्रदर्शन चे मालक कृष्णाजी फडतरे यांनी हॉल व इतर साहित्य मोफत दिलेले होते.
या कवी संमेलनात संपादक योगेश हरणे यांचे *सुखाची सावली* या प्रतिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button