गावगाथा

*चपळगाव प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न!*

दिन विशेष

*चपळगाव प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न!*

चपळगाव 

28 फेब्रुवारी 1928 रोजी थोर भौतिकतज्ञ, शास्त्रज्ञ डॉ C V रमण यांनी प्रसिद्ध रमण इफेक्ट जगासमोर मांडले. म्हणून आज 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवम्हणून साजरी करतात.
ग्रामीण विद्या विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चपळगाव येथे भारतरत्न डॉ. C V रमण यांच्या प्रतिमेचे क्रीडाशिक्षक बानेगाव सरांच्या हस्ते संपन्न झाले. व्यासपीठावर CEO N M पाटील सर,वडतिले सर,कदम सर,उटगे सर,म्हमाणे सर,श्रीमती उडचाण मॅडम,कलशेट्टी सर, मदने सर,भकरे सर,फताटे सर, मल्लिनाथ पाटील सर,श्रीमती इंगुले मॅडम उपस्थित होते.

याप्रसंगी नीलकंठ पाटील सरांनी आजच्या विज्ञान दिवसाचे महत्व दैनंदिन जीवनातील वैज्ञानिक घटना कसे असतात किंवा घडतात हे अतिशय रंजकपणे सांगितले.

या दिनाचे औचित्य साधून विज्ञान विभागाकडून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते.या प्रदर्शनाचे उद्धघाटन पर्यवेक्षक श्री.माने सर यांच्या हस्ते झाले.
यामध्ये भरपूर विध्यार्थ्यानी सहभाग घेऊन विविध उपकरणे बनवलेली होते. गुरुजन वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आणि सर्व
विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन ही उपकरणांची माहिती घेऊन कौतुक केले.विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व विज्ञान विषयाचे शिक्षक वर्ग व शिक्षिकावर्ग यांनी मार्गदर्शन केले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मल्लिनाथ पाटील सरांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button