खूप दिवसांनी मनोभावे स्वामींच्या दर्शनाने आनंद – मा.महान क्रिकेटपटू वेंगसरकर
मंदिरातील सुशोभीकरण व प्रसन्न गाभाऱ्यातील वातावरण पाहून चित्ताला शांती

खूप दिवसांनी मनोभावे स्वामींच्या दर्शनाने आनंद – मा.महान क्रिकेटपटू वेंगसरकर

मंदिरातील सुशोभीकरण व प्रसन्न गाभाऱ्यातील वातावरण पाहून चित्ताला शांती

(अक्कलकोट,दि.२८/२/२४)
(Shrishail Gavandi)
आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात आल्यानंतर स्वामींच्या या वटवृक्षाखाली बसून स्वामींचे जप व स्मरण केलेले प्रसंग माझ्या जीवनातील सगळ्यात अनमोल असे प्रसंग आहेत, कारण आम्ही वेंगसरकर कुटूंबीय हे पुर्वीपासूनच स्वामी भक्त आहोत. आज पुन्हा एकदा या वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आल्यानंतर मंदिरातील बदल पाहून तसेच स्वामींच्या दर्शनाने आपल्याला चित्ताला शांती लाभून
खूप दिवसांनी मनोभावे स्वामींच्या दर्शनाने आनंद झाला असल्याचे मनोगत भारतीय क्रिकेट संघाचे मधल्या फळीतील भुतपुर्व महान फलंदाज दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिलीप वेंगसरकर यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. या प्रसंगी वेंगसरकर बोलत होते. पुढे बोलताना वेंगसरकर यांनी सन १९८३ साली भारतीय क्रिकेट संघाकडून युरोपमध्ये आपणास क्रिकेट विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली. त्या काळी युरोपला जाण्यातत्पुर्वी आपण स्वामींचे नामस्मरण नित्यपणे करुनच लंडनला गेल्यानंतर भारतीय संघाने थेट विश्वचषकाला गवसणी घातल्याचा आनंद आजही आपणास असल्याच्या आठवणींना उजाळा दिल्या. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, प्रसाद सोनार, संजय पवार, श्रीकांत मलवे, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, ऋषिकेश लोणारी आदींसह अन्य भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – दिलीप वेंगसरकर यांचा देवस्थान कार्यालयात महेश इंगळे यांनी सत्कार करतानाचे प्रसंग.
