स्वामी कृपेने लाभलेले व जनतेने दिलेले कौलामुळे लाभलेले महापौरपदाचा कार्यकाल लोकसेवेसाठी समर्पित – महापौर विनायक कोंड्याल
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर सोलापूर महापालिकेचे नुतन महापौर विनायक कोंड्याल यांचे मनोगत.
नुतन महापौर विनायक कोंड्याल व कुटूंबियांचा वटवृक्ष मंदीरात नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार
(श्रीशैल गवंडी, दि.०८/०२/२६.अ.कोट)
स्वामी कृपेने लाभलेले व जनतेने दिलेले विजयी कौल मान्य करून लाभलेल्या महापौरपदाचा कार्यकाल लोकसेवेसाठी समर्पित असल्याचे मनोगत भारतीय जनता पार्टीचे सोलापूर महापालिकेचे नूतन महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केले. आज येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास नुतन महापौर विनायक कोंड्याल यांनी सहकुटूंब भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी महापौर विनायक कोंड्याल यांचा श्री स्वामी समर्थाचे कृपावस्त्र, प्रसाद देवून सपत्निक व सहकुटूंब यथोचित सत्कार केला. यावेळी महापौर कोंड्याल बोलत होते. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, समर्थ नगर ग्रामपंचायतचे प्रदीप पाटील, श्रीकांत मलवे, विपूल जाधव व अन्य उपस्थित होते.
फोटो ओळ – महापौर विनायक कोंड्याल यांचा वटवृक्ष मंदीर अतिथी कार्यालयात
श्री स्वामी समर्थाचे कृपावस्त्र, प्रसाद देवून सपत्निक व सहकुटूंब यथोचित सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!