*रोटरी क्लब ऑफ सोलापूर ने केली आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची दिवाळी गोड.*
सामाजिक बांधिलकी
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/11/FB_IMG_1699605039020.jpg)
*रोटरी क्लब ऑफ सोलापूर ने केली आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची दिवाळी गोड.*
——
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
रोटरी क्लब ऑफ सोलापूर च्या वतीने दिपावली महोत्सवाचे औचित्य साधून आज हंजगी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिपावली पूर्वी फराळ वाटप करुन विद्यार्थ्यांची दिवाळी गोड केली आहे.रोटरी क्लब ऑफ सोलापूर चे अध्यक्ष डाॅ ज्योती चिडगुपकर,सेक्रेटरी विद्याताई मणुरे,रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष
जयेश पटेल असिस्टंट गव्हर्नर राजन होरा आणि स्पॉन्सर्ड केतन होरा यांच्या नेतृत्वाखाली सध्या सोलापूर जिल्ह्यात रोटरी क्लब च्या माध्यमातून समाजातील अनेक गरीब,गरजू व वंचित वर्गांना न्याय देऊन माणुसकी जपण्याचे काम होत आहे.दरवर्षी दिपावलीचे औचित्य साधून फराळ वाटपाचे कार्यक्रम घेण्यात येते.त्याचाच एक भाग म्हणून आज हंजगी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना लाडू ,चिवडा आदी फराळ वाटप करुन दिपावली निमित्त विद्यार्थ्यांचा उत्साहा वाढविला आहे.
यावेळी हंजगी गावचे प्रतिष्ठित नागरिक बाबुशा मणुरे,भारती मणुरे,माध्यमिकचे मुख्याध्यापक विश्वनाथ बिराजदार,यशवंत पाटील ,मल्लिनाथ होसुरे,सिध्दाराम चौधरी,सिध्दगोंडा बिराजदार,चिदानंद बाबा, मोहन कुलकर्णी,चनबसप्पा तुकशेट्टी,अरविंद महामुनी,भोजराज बनसोडे,अरविंद सोनकांबळे,शामका राठोड,बसवराज हडपद,चिदानंद हडपद व पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
फोटो ओळ
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
रोटरी क्लब ऑफ सोलापूर च्या वतीने हंजगी येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फराळ वाटप करताना मान्यवर.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)