इब्राहिमपूर जिल्हा परिषद कन्नड शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…
वार्षिक स्नेहसंमेलन 2024

इब्राहिमपूर जिल्हा परिषद कन्नड शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…


इब्राहिमपूर — येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेची स्नेहसम्मेलन भवानी मंदीर पठांगण मध्ये संपन्न झाले,कार्यक्रमाचे अध्यक्ष- संजयकुमार यशवंत पाटील होते.कार्यक्रमाचे उद्घाटक महादेव शिवनिंगप्पा रेऊरे होते.कार्यकारी अध्यक्ष बंडेप्पा बाबूराव कौलगी होते.प्रतिमा पूजन शिवनिगप्पा कौलगी व शाणप्पा बिराजदार यानी केलं,स्टेज पूजा महांतेश बनसोडे यानी केली व वाद्य पूजा संजीवकुमार बनसोडे यांचे हस्ते करण्यात आले, दिप प्रज्वलन मल्लीनाथ कुंभार व शिवलिंगप्पा दिंडूरे यांनी केली,कार्यक्रमात लोकनृत्य,देशभक्ती गीते, हास्य डॉन्स,मुकाअभिनय, हास्य नाटक,भूताचे नृत्य, पोपीट डान्स, लावणी डान्स इत्यादी कार्यक्रम अतिशय सुंदररित्या शाळेतील मुलांचे सुप्त गुण कौशल्य पाहुन गावकरी मंडळी कौतक केले. कार्यक्रमास अक्कलकोट तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे साहेब यांनी उपस्थित राहुन शाळेची मुलांची कौतुक केले

गावातील पालक वर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व मंडळी,बमलिंगप्पा देशमुख, भिमाशंकर कौलगी, श्रीकांत कौलगी, कल्लप्पा कौलगी, गुडेराव टोणे, महांतेश नरुणे, शिवलिंगप्पा टोणे, हणमंत टोणे, रमेश बनसोडे, सिद्धाराम बनसोडे, इरण्णा करडे सर, गणपती दळवाई सर, कल्येणी करडे सर, मल्लीनाथ टोणे सर, विश्वनाथ कौलगी सर, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विस्ताराधिकारी दयानंद कवडे साहेब,रतिलाल भूसे साहेब, केंद्र प्रमुख इंद्रशेन पवार यांचे मार्ग दर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीशैल खानापूर सर व कल्याणी करडे सर यांनी केली, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपाली धुत्तरगी मॅडम, गुरूदेवी आलमेल मॅडम,आश्विनी हिटनळ्ळी मॅडम,सुरेखा मिसे मॅडम, सुजाता बनसोडे, भिमाबाई बनसोडे, कविता भाविकट्टी यांची विशेष योगदान लाभले. महांतेश्वर-भवानी तरूण मंडळ,बसवेश्वर तरूण मंडळ,सिध्दार्थ तरुण मंडळ, गणेश तरुण मंडळ यांचे अनमोल सहकार्य लागले,शेवटी मुख्याध्यापक अशोक पोमाजी यांनी सर्वांचे आभार मानले.
