
दि.१८ मार्चला कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनमध्ये आरोग्य शिबीराचे आयोजन

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.८/३/२४) –
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मा.चेअरमन कै.कल्याणराव इंगळेंच्या पुण्यस्मरणानिमीत्त सोमवार दि. १८ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत जगप्रसिद्ध नाडीतज्ञ डॉ.के.बासू व सपना बासू यांचे सर्व आजारावर आरोग्य शिबिर आयोजीत करण्यात आले आहे. हा शिबीर श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलीत मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील कै. कल्याणराव इंगळे महाविद्यालयात संपन्न होईल. या शिबीरात सर्व आजारांवर अचूक निदान करून गुणकारी उपचार सेवा होणार आहे, तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदीर समितीचे व तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.
