पत्रकार मारुती बावडे यांचा रविवारी अक्कलकोट भूषण पुरस्काराने गौरव..
अक्कलकोट तालुक्यातील अनेक पत्रकारांचे होणार सन्मान

पत्रकार मारुती बावडे यांचा रविवारी अक्कलकोट भूषण पुरस्काराने गौरव..

अक्कलकोट तालुक्यातील अनेक पत्रकारांचे होणार सन्मान

प्रतिनिधी

अक्कलकोट, — अक्कलकोटचे
पत्रकार मारुती बावडे यांना नुकताच आंतरराष्ट्रीयस्तरावरचा ग्रामीण पत्रकारितेतील पुरस्कार मिळाल्याबद्दल समस्त अक्कलकोट तालुकावासीयांच्यावतीने त्यांचा अक्कलकोट भूषण पुरस्कार व मानपत्र देऊन मोठा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती नागरी
सत्कार समितीचे अध्यक्ष दिलीप सिद्धे
व कार्याध्यक्ष सुधीर माळशेट्टी यांनी
दिली.हा गौरव सोहळा रविवार
दि.१७ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता
मंगरुळे फंक्शन हॉल, कांदा बाजार येथे होणार
असून हा कार्यक्रम पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते तसेच खासदार डॉ.
जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आमदार सचिन कल्याणशेट्टी,
माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे,ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी ( मुंबई ),श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुष्पराज काडादी, गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे,जय हिंद शुगरचे चेअरमन गणेश माने, सोलापूर आकाशवाणीचे केंद्रप्रमुख सुजित बनसोडे,
श्री वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे,स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले,सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम
खेलबुडे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.पत्रकार मारुती बावडे यांना आत्तापर्यंत चांगल्या कामामुळे राज्य तसेच जिल्हास्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.पत्रकारितेच्या माध्यमातून मागच्या तेवीस वर्षात त्यांनी सर्व समावेशक,निःपक्षपातीपणे विकासात्मक लेखन करून तालुक्याच्या विकासात
बहुमोल असे योगदान दिल्याबद्दल हा
गौरव आम्ही तालुक्याच्यावतीने करत आहोत,असे सिद्धे यांनी सांगितले.
बावडे यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरून घेतली गेल्याने अक्कलकोटचा सन्मान वाढला असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे यांनी सांगितले. बावडे यांच्या पत्रकारितेतून दिनदलित,गोर गरीब, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाल्याने व पहिल्यांदाच तालुक्याला त्यांच्या रूपाने
असा मोठा बहुमान मिळाल्याने आनंद
झाला आहे,असे माळशेट्टी यांनी सांगितले.
या कार्यक्रमात तालुक्यातील जेष्ठ पत्रकार
बाबा निंबाळकर ( लोकसत्ता ) ,स्वामीनाथ हरवाळकर ( पब्लिक न्यूज १८),अरुण
जाधव ( अक्कलकोट प्रभात),शिवानंद फुलारी( लोकमत ),प्रशांत भगरे ( संचार ),अरविंद पाटील( पुण्य नगरी),
सैदप्पा इंगळे ( दिव्य मराठी),
चेतन जाधव ( सकाळ),सोमशेखर जमशेट्टी ( संयुक्त कर्नाटक ),योगेश कबाडे ( दिव्य मराठी),नंदकुमार जगदाळे ( सामना ) ,
प्रवीण देशमुख ( अक्कलकोट समर्थ ),
वीरपाक्ष कुंभार ( संचार ),शंभुलिंग
अकतनाळ ( लोकमत),बसवराज बिराजदार ( तरुण भारत),शिवा याळवार (पुढारी),
रविकांत धनशेट्टी ( सुराज्य ),
स्वामीराव गायकवाड( रयत संवाद),
महेश गायकवाड ( प्रीती संगम ),
राजेश जगताप ( जनमत ),
रमेश भंडारी ( दामाजी एक्स्प्रेस ),
दयानंद दणूरे (तरुण भारत संवाद),
यशवंत पाटील ( पुढारी ),
अभिजीत पत्की (तरुण भारत संवाद ),
गणेश भालेराव ( अक्कलकोट सिटी )
यांचाही सत्कार होणार असल्याची माहिती नागरी समितीने दिली आहे.या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष संजय देशमुख, मार्गदर्शक एड.शरद फुटाणे,जेष्ठ नेते अश्पाक बळोरगी, मल्लिकार्जुन पाटील,उमेश पाटील
यांनी केले आहे.यावेळी उपाध्यक्ष
लाला राठोड,महिबुब मुल्ला,एजाज मुतवल्ली,सचिव जितेंद्रकुमार
जाजू,मार्गदर्शक बसलिंगप्पा खेडगी,
सुनील बंडगर,अविनाश मडीखांबे,
मोहन चव्हाण आदी उपस्थित होते.
