सोलापुरात एम के फाऊंडेशन च्या माध्यमातून पाणपोई केंद्रे सुरु.
तीव्र उन्हाळ्यात माणूसकी जपणारा महादेव पुन्हा एखदा चर्चेत.

सोलापुरात एम के फाऊंडेशन च्या माध्यमातून पाणपोई केंद्रे सुरु.

जिथे परिस्थिती गंभीर तिथे महादेव खंबीर.

तीव्र उन्हाळ्यात माणूसकी जपणारा महादेव पुन्हा एखदा चर्चेत.

——–

दरवर्षी उन्हाळ्यात सामजिक कार्याचे भान ठेऊन एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी स्वखर्चाने पाणपोई सुरू करत असतात.यंदा ही सोलापूर जिल्ह्य़ात तापमानात वाढ होत असताना व सर्व सामान्य माणसांची गरज ओळखून एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंट चे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी तहानलेल्या सोलापूरकरासाठी घोटभर थंड पाणी पिऊन क्षणभर विश्रांती घेण्यासाठी सोलापुरात जागोजागी आज पाणपोई केंद्र सुरु करण्यास सुरुवात केली

आज सोलापुर येथील सैफूल व हत्तुरे वस्ती भागात नागरिकांना थंड पाणी मिळावे म्हणून एक के फाउंडेशन च्या वतीने पाणपोई केंद्र सुरु करण्यात आले आहे. नेहमीच सामजिक कार्यात अग्रेसर असणारी एम के फाउंडेशन यंदा तीव्र उन्हाळ्यात सामाजिक सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिल्याने एम के फाउंडेशन चे सर्वत्र कौतुक होताना पहायला मिळत आहे. कारण सर्व सामान्य नागरिकांची तहान भागविण्याचे पुण्य आज महादेव कोगनुरे यांच्याकडून होताना दिसून येत आहे.भर उन्हाळ्यात रस्त्यावरून जाणार्या व्यक्तींना पाणपोई दिसली की क्षणभर विश्रांती घेऊन घोटभर पाणी पिऊन नंतरच पुढचा मार्ग धरावा लागतो. पाणपोई हा एक सामजिक उपक्रम आहे.आजकाल बहुसंख्य ग्रामीण भागातील नागरिक शहरी भागात येत असतात त्यांची विकत पाणी घेऊन पिण्याची परिस्थिती नसते. त्यामुळे हे लोक पाण्यासाठी हाॅटेल, चहाच्या टपरीचा आधार घेत असतात.अशा माणसांना पाणपोई हे एक आधार देण्याचे काम करीत असते.म्हणूनच भर उन्हाळ्यात सर्व सामान्य माणसांची गरज ओळखून एम के फाउंडेशन च्या वतीने शहरातील विविध भागात पाणपोई केंद्र सुरु करण्यात येत असल्याचे एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी सांगितले.
एम के फाऊंडेशन चे संचालक, सदस्य व बहुसंख्य प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत सोलापुरात जागोजागी पाणपोई केंद्राचे शुभारंभ करण्यात आले.