गावगाथा

*गावगाथासाठी प्रतिनिधींची नियुक्ती सह-संपादकपदी डॉ. अमोगसिद्ध चेंडके यांची नियुक्ती*

निवड नियुक्ती

*गावगाथासाठी प्रतिनिधींची नियुक्ती सह-संपादकपदी डॉ. अमोगसिद्ध चेंडके यांची नियुक्ती*
पुणे : लोकप्रिय साप्ताहिक गावगाथासाठी चार महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सहसंपादक म्हणून डॉ. अमोगसिद्ध चेंडके यांची निवड करण्यात आली असून, अहिल्यानगर प्रतिनिधी म्हणून शुभम रामहरी दातखिळे, पुणे शहर प्रतिनिधी म्हणून रोहिदास खेडकर आणि गोवा राज्य प्रतिनिधी म्हणून कुणाल धारगळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्या गावगाथाचे मुख्य संपादक धोंडप्पा नंदे यांनी जाहीर केल्या.
नियुक्तीचा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या दालनात पार पडला. यावेळी मुख्य संपादक धोंडप्पा नंदे आणि डॉ. रोंगटे सर यांच्या हस्ते निवड झालेल्या प्रतिनिधींना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच मराठी विभागात त्यांचे अभिनंदनही करण्यात आले.
या प्रसंगी मराठी विभागप्रमुख रोंगटे सर यांनी नव्याने नियुक्त झालेल्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना पत्रकारितेत सत्यता, सामाजिक बांधिलकी जपणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. समाजातील महत्त्वाचे प्रश्न, लोकजीवन आणि सांस्कृतिक घडामोडी यांना माध्यमातून योग्य स्थान मिळावे, यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच पत्रकारितेमुळे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची मोठी संधी मिळते, याची जाणीव ठेवून काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी विभागातील प्राध्यापक डॉ. उमेश सिरसट, डॉ. सदाशिव शिंदे, डॉ. सिद्धार्थ लांडे, डॉ. अनिल पवळ, डॉ. सुरेश रासकर व संशोधक विशाल साळवे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button