गावगाथा

दामोदर मोरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

पुरस्कार

दामोदर मोरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
आविष्कार सोशल एजुकेशनल फौंडेशन (NGO )यांच्यातर्फे दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय महात्मा ज्योतीबा फुले शैक्षणिक सेवा कार्यगौरव पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे .दामोदर महादेव मोरे हे जि .प प्राथमिक केंद्रीय शाळा सिरसदेवी या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत .अध्यक्ष म्हणून शाळेसाठीची जबाबदारी आणि कर्तव्य अतिशय वाखाणण्याजोगी आहे .या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार येत्या 29 मार्च 2026 रोजी सोलापुरात सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे .शाळेविषयी त्यांचे कार्य खूप मोलाचे आहे .शाळेला लागणाऱ्या सुविधा त्यांची शाळेबद्दलची धडपड शिक्षकाविषयी समाजाविषयी आदर प्रेम याविषयी तर ते कायमच चर्चेत आहेत .प्रत्येक शाळेला असा अध्यक्ष मिळावा असे समाजात बोलले जाते .त्यांचे सामाजिक कार्य मोठे आहे .शाळेसाठी जे कांही योगदान देता येईल ते स्वखर्चाने करतात .आवडीने सर्व गोष्टीत सहभाग घेतात .क्वचितच असे दामोदर मोरे सारखे निस्वार्थी प्रामाणिक कामं करणारी माणस असतात सामाजिक कार्य आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य खूप महत्वपूर्ण आहे त्यांच्या सहकार्याने सिरसदेवी ता .गेवराई जि .बीड ची केंद्रीय शाळा नावारूपाला आली आहे.दामोदर मोरे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्रच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कौतुकाला अधिकच पात्र ठरत आहेत .दामोदर मोरे त्रिवार अभिनंदन .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button