गळोरगीची सुकन्या कु स्नेहल संगापुरे हिचा श्री स्वामी समर्थ देवस्थान व अन्नछत्र मंडळ तर्फ सत्कार.
सत्कार

गळोरगीची सुकन्या कु स्नेहल संगापुरे हिचा श्री स्वामी समर्थ देवस्थान व अन्नछत्र मंडळ तर्फ सत्कार.

ता. अक्कलकोट मौजे गळोरगी येथील कु स्नेहल शिवलिंगप्पा संगापुरे हिचा माहे जुन २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टड अकौंटटस फांउडेशन परीक्षेत पहिल्या ॲटेम्प्ट मध्ये उत्तीर्ण झाल्याने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अन्नछत्र मंडळाचे श्री अमोलराजे जन्मेजय भोसले यांनी तिचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. जुन २०२४ मध्ये चार्टड अकौंटट्स फांऊडेशन परीक्षेसाठी संपुर्ण महाराष्ट्रभर एकुण ९२००० विधार्थी बसले होते. महाराष्ट्रात या परीक्षेचा एकुण केवळ १५ % निकाल लागत त्या मध्ये फक्त १२००० विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवले.सोलापुर जिल्ह्यात एकुण ३०० विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते , त्यामध्ये ३९ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. कु स्नेहल संगापुरे हीने घवघवीत यश मिळवत अक्कलकोट तालुक्यात एकमेव उत्तीर्ण विद्यार्थीचा मान पटकावला. निकाल लागल्यानंतर कु स्नेहलने आपल्या कुटुंबासमवेत अक्कलकोट आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले.गळोरगी मधुन प्रथम चार्ट्ड अकौटंटचा मान कु स्नेहल हिला मिळणार असल्याने संपुर्ण गळोरगी ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करुन तोंड भरुन कौतुक केले.अक्कलकोटचे विद्यमान आमदार श्री सचिन दादा कल्याणशेट्टी , गळोरगी सुपुत्र पुणे मार्कटयार्ड येथील व्यापारी श्री पंडीत जकापुरे आणि श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच गळोरगी संस्थापक अध्यक्ष श्री सिध्देश्वर बिराजदार यांनी तिच्या या यशाबद्दल परगावी असल्याने दुरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या.सत्कार प्रसंगी अन्नछत्र मंडळाचे श्री अमोल राजे भोसले व तिचे वडील श्री शिवलिंगप्पा रेवणसिध्द संगापुरे आदी उपस्थित होते.
