गावगाथा

अक्कलकोट येथे १८५वी जागतिक छायाचित्र दिवस साजरा अक्कलकोट येथे फोटोग्राफर तर्फे जागतिक छायाचित्र दिन साजरा,…

दिन विशेष

अक्कलकोट येथे १८५वी जागतिक छायाचित्र दिवस साजरा अक्कलकोट येथे फोटोग्राफर तर्फे जागतिक छायाचित्र दिन साजरा,…

 

अक्कलकोट विठ्ठल मंदिर तेथे आयोजित कार्यक्रमात सर्व प्रथम श्री स्वामी समर्थ, श्री विठ्ठल रुक्मिणी व कॅमेराची पूजा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीकांत चव्हाण, आपू रोडगे, धनप्पा हतुरे यांचा सत्कार करण्यात आला. त्या नंतर विठ्ठल मंदिर येथुन कॅमेराची सजवलेल्या पालखी तून डोल, बाजा, व लातूर येथील भारूड संघासह वाजत गाजत अक्कलकोट येथील विठ्ठल मंदिर, ते एवन चौक, बस स्थानक, कारंजा चौक, फतेशिंह चौक असे मुख्य रस्त्या वरून मिरवणूक काढण्यात आला. या मिरवणुकीत अक्कलकोटसह तालुक्यातील सर्व फोटोग्राफर पांढरा नेहरू शर्ट व पायजमा घालून सहकुटुंब सहभागी झाले होते

मिरवणुकी नंतर अक्कलकोट फोटोग्राफर असो सियसन चे तालुका अध्यक्ष राहुल राठोड उपाध्यक्ष शिवानंद कलशेट्टी भोसले सचिव स्वामीनाथ कुंभार सहसचिव प्रवीण मोरे खजिनदार अरुण हत्तुरे याचा सत्कार करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबू बाजार मठ नुरजी पटेल, गणेश राठोड, ईश्वर नरवडे, महंतया स्वामी, विजयराज खेडगीकर राजशेकर हिरेमठ, विजय गायकवाड, मल्लिनाथ कलशेट्टी सुनिल शिरगण सोन्याबापू शिरगापुरे, किशोर बनाजगोळ नागेश प्रचेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचलन बाबू बाजार मठ यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button