गावगाथा

वरद विनायक गणेश मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

वर्धापन दिनानिमित्त विशेष

वरद विनायक गणेश मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

( श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.५/०६/२०२५)
– येथील संजय नगर हसापूर रोड अक्कलकोट येथील एस.एन.ग्रुप मित्रमंडळाच्या श्री वरदविनायक गणेश मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व श्रध्देय भक्तीभावाने विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाला. आज रोजी पहाटे ५ वाजता पुरोहित सतिष अप्पा स्वामी यांच्या वैदिक मंत्रोच्चारात मंडळाचे सदस्य
सौ व श्री संतोष माने व कुटुंबीय यांच्या हस्ते
श्री वरदविनायक गणेशास महापुजा व महाअभिषेक करण्यात आला. तदनंतर विधिवत होमहवन करुन महाआरती करण्यात आली. या वर्धापन दिनानिमीत्त येणाऱ्या गणेश भक्तांकरीता भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. दिवसभर अनेक भाविकांनी श्रींचे दर्शन घेवून भोजन महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा मा.नगरसेवक बसलिंगप्पा (मुत्तु) खेडगी, श्री वटवृक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष तथा मा.नगरसेवक महेश इंगळे, श्रीमंत चेंडके, चंद्रकांत गवंडी, अप्पाशा गवंडी, श्रीशैल गवंडी आदिनी प्रमुख उपस्थितीत श्रीचे दर्शन घेवून आशिर्वाद घेतले. या प्रसंगी वरील मान्यवरांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या उत्सवा निमीत्त वरद विनायक गणेश मंदिरास आकर्षक फुलांची सजावट करून विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता वरद विनायक गणेश मंदीराचे अनिल गवंडी, अमोल गवंडी, इरण्णा गवंडी, व्यंकटेश गवंडी, परमेश्वर उर्फ अप्पा शिंदे, अनिल गवंडी, श्रीशैल गवंडी, अमोल गवंडी,
लक्ष्मण कोळी, सुर्यकांत बनसोडे, राकेश गवंडी, लक्ष्मण बिराजदार, देविदास गोबरे, दत्ता गवंडी, उमेश गवंडी, महांतेश गवंडी, नितीश चव्हाण, अप्पू बिराजदार, बबलु कासार, प्रदिप चव्हाण, कांतू आडवितोटे, अंबादास माशाळकर, स्वामीनाथ चव्हाण, शौकत नाईकवाडी, बाजीराव जाधव व इतर सर्व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button