गावगाथा

ST बसचे Live लोकेशन समजणार; वाट बघण्याचे दिवस संपले

ST Bus Live Location

ST Bus Live Location : आता ST बसचे Live लोकेशन समजणार; वाट बघण्याचे दिवस संपले

एसटी बस म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांचा काळजाचा विषय… सुरक्षित प्रवास आणि तोही कमी खर्चात यामुळे एसटी बस प्रत्येकाला आपल्या हक्काचीच वाटते जणू… त्यामुळे कितीही उशीर का होईना एसटी बसने च प्रवास करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. खास करून लांबच्या पल्ल्यासाठी सुरक्षिततेचे महत्वाचं साधलं मानलं जाते. मागच्या काही महिन्यात एसटी प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असून बऱ्याच वेळेला तासनतास बसच्या येण्याची वाट पाहावी लागते . यावर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने एक नवीन अँप लाँच केलं आहे. हे अँप येत्या १५ ऑगस्ट पासून प्रवाशांच्या सेवेत येणार असून या अँपच्या माध्यमातून तुमची बस आत्ता नेमकी कुठे आहे याचे लाईव्ह लोकेशन तुम्हाला समजणार आहे. यामुळे उगीच तासनतास वाट बघायची गरज आता राहणार नाही.

HTML img Tag Simply Easy Learning    

लालपरीच्या प्रवाशांना आपल्या तिकिटावर असलेल्या नंबरच्या माध्यमातून बसची अचूक वेळ जाणून घेता येणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांना ज्या बसने जायचं त्याची वाट पाहावी लागणार नाही आणि खोळंबा देखील होणार नाही. या ॲपसंदर्भात परिवहन मंडळाने एक अधिकृत श्वेतपत्रिका जाहीर केली असून एसटी बसचे लाईव्ह लोकेशन (ST Bus Live Location) प्रवाशांना या ॲपद्वारे प्राप्त होणार आहे. यासाठी राज्यातील एसटीमध्ये जीपीएस बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून आतापर्यंत 12 हजार एसटी बसेसमध्ये जीपीएस बसवले गेले आहेत. त्यासोबतच त्या आणि इतर बसेसचे थांबे त्यांचे मार्ग आणि आपली बस आपल्या स्टॅन्डला कधी येणार या सर्वांची माहिती आपल्याला मोबाईल वर अचूकपणे समजणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

तस बघितलं तर महाराष्टात एसटीचे जाळे खुपु मोठं आहे. अगदी दुर्गम भागातही एसटी पोचते.. स्वस्त आणि परवडणारा प्रवास असल्याने प्रवाशांचा सुद्धा मोठा प्रतिसाद एसटीला लाभत असतो. आजघडीला राज्यात एसटीच्या 50 हजार मार्गांवर सव्वालाख फेऱ्यांमधून रोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. मात्र लांब पल्ल्याच्या प्रवाशांना बसचे ठिकाण समजत नाही. त्यामुळे तासनतास बस ची वाट बघत ताटकळत राहावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठीच नवीन अँप बनवण्यात आलं असून येत्या १५ ऑगस्ट पासून हे अँप प्रवाशांच्या सेवेत येईल. या अँपच्या माध्यमातून तुमची बससध्या नेमकी कुठं (ST Bus Live Location) आहे? तुमच्या स्टॉपवर यायला तिला किती वेळ लागेल? हे समजणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button