
गुरुपौर्णिमा निमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यलय अक्कलकोट येथे महत्वाची *बैठक*

अक्कलकोट- गुरुपौर्णिमा निमित्ताने श्री.विलास यामावार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कार्यालय अक्कलकोट येथे प्रशासकीय अधिकारी,मंदिर समिती आणि अन्नछत्र मंडळ ट्रस्ट यांची बैठक घेण्यात आली….

बैठकीमध्ये दिनांक 21/07/2024रोजी *गुरुपौर्णिमा* निमित्त अक्कलकोट शहरात छोटे -मोठे वाहन मंदिर परिसराकडे येऊन गर्दी करणार नाहीत त्या अनुषंगाने नगरपालिका यांचेकडून अक्कलकोट शहरातील महत्वाच्या ठिकाणी मजबुत स्वरूपाचे बॅरेंगेटिंग करण्यात यावेत असे तसेच मंदिर परिसरातील महत्वाचे ठिकाणी PA सिस्टीम (लाऊड स्पीकर) व्यवस्था करणेबाबत श्री विलास यामावार यांनी सुचना केलेल्या आहेत, त्यावेळी संबंधित नगरपालिकाचे नगर रचनाकार शुभम माहुरे, शैलेश बिराजदार यांनी कमलाराजे चौक, फत्तेसिंह चौक, कारंजा चौक, मैंदर्गी नाका,भक्त निवास हत्ती तलाव, समाधी मठ या ठिकाणी लाकडी बॅरेंगेटिंग करण्यात येणार आहेत. असे सांगितले.
तसेच श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर,अन्नछत्र मंडळ, भक्तनिवास, मैंदर्गी नाका,या ठिकाणी वाहनांची गर्दी न होता भाविकांना दर्शन घेणे सुलभ होईल कोणताही त्रास होणार नाही या दृष्टीने मंदिर परिसरात चारचाकी वाहने येणार नाहीत ते बाह्य वळणाने(बायपासने) बाहेरच जातील याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांना नियोजन करणे बाबत सांगण्यात आले आहे.छोट्या वाहनांची पार्किंग व्यवस्था *कमलाराजे चौक* *हत्ती तलाव जवळ बासलेगाव रोड,* श्री *स्वामी समर्थ दवाखाना मैंदर्गी रोड* , *अन्नछत्र मंडळ* याच ठिकाणी करण्यात आलेले आहे.. *अन्नछत्र मंडळात* असलेली पार्किंग व्यवस्था
मैंदर्गी रोडच्या *बाहेर पडणाऱ्या गेट मधुनच* *प्रवेश करेल आणि तेथुनच बाहेर* पडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याबाबत अमोलराजे भोसले यांनी सहमती दर्शविली आहे.
मंदिर समिती आणि अन्नछत्र मंडळ यांना, विलास यामावार यांनी मंदिरातील दर्शन रांग, भाविकांना रांगेत पिण्याची पाण्याची व्यवस्था,सध्या पावसाचे दिवस असल्याने बाहेरील दर्शन रांगेत मंडपची/पत्रे यांची व्यवस्था करण्यात यावी .त्यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे आणि अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले.
कोठेही अनुचित प्रकार घडु न देता अतिशय चांगल्या पद्धतीने श्री गुरुपौर्णिमा चे नियोजन पोलीस प्रशासन, नगरपालिका आणि आम्ही स्वतः हजर राहुन भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. असे तहसीलदार विनायक मगर यांनी सांगितले..

बैठकीला तहसीलदार विनायक मगर
नगरपालिकाचे नगर रचनाकार शुभम माहुरे,शैलेश बिराजदार
पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे ,श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले , कार्यालयाचे धनराज शिंदे, गोपनीय अंमलदार गजानन शिंदे, हजर होते…
