गावगाथाठळक बातम्या

Akkalkot : दिल्लीत होणाऱ्या शासकीय कार्यशाळेसाठी चपळगावच्या सरपंच वर्षा भंडारकवठे यांची निवड ; तालुक्यातून एकमेव….

चपळगाव (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या अनुषंगाने पंचायती राज मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने चार व पाच मार्च रोजी होणाऱ्या शासकीय कार्यशाळेसाठी अक्कलकोट तालुक्यातील चपळगावचे सरपंच वर्षा सिध्दाराम भंडारकवठे यांची निवड झाली आहे.

दिल्ली येथील कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ४० तर सोलापूर जिल्ह्यातून ७ महिला प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे.यामध्ये संपूर्ण अक्कलकोट तालुक्यातून चपळगावच्या सरपंच वर्षा सिध्दाराम भंडारकवठे यांची एकमेव निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी ज्या ज्या सरपंचांची धडपड आहे अशा महिला प्रतिनिधींची निवड करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळके यांच्याकडून सांगण्यात आले.सदर निवडीबद्दल देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,खासदार प्रणिती शिंदे,खासदार धैर्यशील मोहिते पाटील,आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,माजी सरपंच तथा उद्योजक उमेश पाटील, संस्थाध्यक्ष रविकांत पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आप्पासाहेब पाटील,बसवराज बाणेगांव, उपसरपंच सुवर्णा कोळी, जेष्ठ नेते अंबणप्पा भंगे,ग्रामसेवक सोमलिंग कणगी व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button