अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेला महाप्रसाद सेवाकार्य उल्लेखनीय – अयोध्यातील श्री राम मूर्तीचे शिल्पकार अरुण योगीराज म्हैसूर
न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेला महाप्रसाद सेवाकार्य उल्लेखनीय – अयोध्यातील श्री राम मूर्तीचे शिल्पकार अरुण योगीराज म्हैसूर

अक्कलकोट : (प्रतिनिधी)

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेला महाप्रसाद सेवाकार्य उल्लेखनीय असल्याचे मनोगत श्री राम मंदिर अयोध्यातील श्री राम मूर्तीचे शिल्पकार अरुण योगीराज म्हैसूर यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत राज मणियार सोलापूर, शरद कुमार म्हैसूर हे उपस्थित होते.

यावेळी, न्यासाचे लेखाधिकारी ओंकारेश्वर उटगे, सतीश महिंद्रकर, रोहन शिर्के, बालाजी कटारे, सिद्धाराम कल्याणी, गोरखनाथ माळी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, नामा भोसले, दत्ता माने, शरद भोसले, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, अनिल बिराजदार,चंद्रकांत हिबारे, संभाजीराव पवार, गोविंदराव शिंदे, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, लाला निंबाळकर, कल्याण देशमुख, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
