
सेंट टेरेसा शाळेत बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट संपन्न

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लागलीच वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी शाळेतील पीटी शिक्षक संजीवनी गजरे, मेलकम सर, अक्षय जाधव, रोजरियो फर्नांडिस यांनी मुख्याध्यापक फादर निकी यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट चे आयोजन केले होते.आज फायनल मॅचसाठी मॅनेजर फादर हेनरी, स्कूल अडमिन फादर शेनोय, उपमुख्याध्यापिका रोझ लोबो, पर्यवेक्षक फिलिप रॉड्रिग्ज तसेच शाळेतील गणेश हिरवे, रोशल लोबो, आरती कनोजिया, प्रज्ञा करनाळे, रोमल डिब्रेटो आदी शिक्षक वृंद विशेष अतिथी म्हणून हजर होते.इयत्ता पाचवी ते सातवी गटात कॅप्टन ईशांत यादव आणि आठवी नववी गटात कॅप्टन जय कपाडिया यांच्या गटाने विजय संपादन केला तर संपूर्ण टुर्नामेंट मध्ये अर्श शेख याने सुंदर खेळ केल्याने त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट घोषित करण्यात आले. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून हि शाळा कायमच विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन करीत असते.या शाळेतून नृत्य दिग्दर्शक टेरेन्स लुईस, सिनेदिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, बुगीवुगी फेम, जावेद जाफरी, नावेद जाफरी आणि रवी बेहेल आणि इतर अनेक सेलिब्रेटी शिकून यशस्वी झाले असल्याने नक्कीच येथून शिकून मोठे झालेल्या सर्वच विद्यार्थ्याना शाळेचा अभिमान असल्याचे आणि प्रत्येक खेळत हार जीत ही असतेच पण खेळात सहभाग नोंदविणे खूप महत्वाचे असल्याचे फादर निकी यांनी सांगितले.महानायक अमिताभ बच्चन यांच्या डॉन सिनेमात देखील शाळेचा नावाचा उल्लेख आणि चित्रीकरण दाखविण्यात आलेले आहे.
