अन्नछत्र मंडळात, श्री बजरंगी बली की जय..! च्या जय घोषात श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अन्नछत्र मंडळात, श्री बजरंगी बली की जय..! च्या जय घोषात श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.*

दरम्यान श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंडळात महिला भजनी मंडळाने सेवा रुजू केली. पुरोहित संजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत श्री हनुमान पाळणा, गुलाल कार्यक्रम व पूजन, शेकडो भक्तांच्या उपस्थितीत आरती संपन्न झाली. त्या बरोबरच श्रींच्या महानैवेद्य पूजन संपन्न झाले. नैवेद्याचा संकल्प सोडल्या नंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान विधीवत पूजन मंत्र पठन न्यासाचे पुरोहित संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी केले.

श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यास न्यासाचे सचिव शामराव मोरे, बाळासाहेब पोळ, बाळासाहेब घाटगे, शहाजीबापू यादव, नामा भोसले, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, रमेश हेगडे, सिद्धराम कल्याणी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, लाला निंबाळकर, विश्वनाथ कलशेट्टी, देवराज हंजगे, सतीश महिंद्रकर यांच्यासह भक्तगण, सेवेकरी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
