वटवृक्ष मंदिरात धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन योगीराज भजनी मंडळाच्या भजनाने उत्सव भजन सेवेस प्रारंभ
धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पुजन प्रसंगी जया सावंत, प्रथमेश इंगळे, मंदार महाराज पुजारी, आत्माराम घाटगे, महेश गोगी व अन्य दिसत आहेत.

वटवृक्ष मंदिरात धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन योगीराज भजनी मंडळाच्या भजनाने उत्सव भजन सेवेस प्रारंभ

(प्रतिनिधी अक्कलकोट, )


येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादप्रमाणे आज श्री स्वामी समर्थांचा १४६ वा पुण्यतिथी महोत्सव दिनांक २४ एप्रिल ते दिनांक ६ मे अखेर संपन्न होत आहे. त्यानिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन व्यासपीठाची पूजा मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांच्या धर्मपत्नी जया सामंत यांच्या हस्ते प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, ओंकार पाठक, मनोहर देगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोच्चारात मोठया भक्तीभावाने संपन्न झाली.
याप्रसंगी बोलताना प्रथमेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे यंदाचे हे १४६ वे वर्ष आहे. महाराजांच्या १०० व्या पुण्यतिथी पासून वटवृक्ष देवस्थानने धर्मसंकीर्तन कार्यक्रमांची सुरुवात संत साहित्याचे गाढे अभ्यासक कै.डॉ.नरेंद्र कुंटे यांच्या अधिपत्याखाली केली. त्यानंतर मंदिर समितीचे मा.चेअरमन व माझे आजोबा कै.कल्याणराव बाळासाहेब इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.संयोजक कै.डॉ. हेरंबराज पाठक यांनी धर्मसंकीर्तन महोत्सवाची गेल्या २२ वर्ष अखेर धुरा वाहिली. श्रींच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवा निमीत्त आयोजित सर्व धार्मिक कार्यक्रमांचा स्वामी भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सर्व भाविकांना या प्रसंगी केले. तदनंतर दिनांक २४ एप्रिल ते ५ मे अखेर होणाऱ्या भजनसेवेची सुरुवात योगीराज महिला भजनी मंडळ सोलापूर यांच्या भजनसेवेने झाली. या भजन सेवेत अक्कलकोट, सोलापूर, वैराग, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, लातूर, पुणे, माळीनगर, पानमंगरूळ, इत्यादी ठिकाणाहून येणाऱ्या ४८ भजनी मंडळाची भजनसेवा स्वामींच्या चरणी रूजू होणार आहे. सायंकाळी ४ वाजता पुण्यतिथी महोत्सवातील धर्मसंकीर्तन कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थांच्या चरणी वंदन करून व प्रतिमेचे पूजन करून वैरागचे ह.भ.प.भारत महाराज कुलकर्णी (साकतकर) यांच्या प्रवचनाने सुरुवात झाली. पुढील बारा दिवस या धर्मसंकीर्तन सोहळ्यात विविध नामांकित मान्यवरांचे प्रवचन, कीर्तन, भक्तीसंगीत, कथ्थक, गायन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत, तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा व स्वामी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन इंगळे यांनी केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, मंदार महाराज पुजारी, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, ओंकार पाठक, संतोष जमगे, प्रसाद पाटील सर, मिलिंद पोतदार, शिवशरण अचलेर, विजयकुमार कडगंची, चंद्रकांत गवंडी, रवि मलवे, संतोष पराणे, अमर पाटील, श्रीकांत मलवे, अविनाश क्षीरसागर, संजय पाठक, मोहन जाधव, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, सागर गोंडाळ, सिद्धाराम कुंभार, नागनाथ गुंजले, संजय पवार, प्रसाद सोनार, महेश काटकर इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पुजन प्रसंगी जया सावंत, प्रथमेश इंगळे, मंदार महाराज पुजारी, आत्माराम घाटगे, महेश गोगी व अन्य दिसत आहेत.
