मुंबईच्या शाहीर रमेश हडपी कलामंचच्या वटवृक्ष मंदीरातील भक्ती संगीत श्रवणाने श्रोते मंत्रमुग्ध
श्री.वटवृक्ष मंदीरातील धर्मसंकीर्तन महोत्सवात रंगला भक्ती संगीत सोहळा

मुंबईच्या शाहीर रमेश हडपी कलामंचच्या वटवृक्ष मंदीरातील भक्ती संगीत श्रवणाने श्रोते मंत्रमुग्ध

श्री.वटवृक्ष मंदीरातील धर्मसंकीर्तन महोत्सवात रंगला भक्ती संगीत सोहळा

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि. २५/४/२४) येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात श्री.स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी निमीत्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील आज प्रथम पुष्पातील दुसऱ्या सत्रात मुंबईच्या शाहीर रमेश हडपी कलामंच व निवेदक ओंकार जाधव यांच्या सेवेतून वटवृक्ष मंदीरातील भक्ती संगीत श्रवणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवर कलाकारांचा मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेक्रेटरी आत्माराम घाटगे, प्रथमेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे
कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सत्कार केला. या भक्ती संगीताची सुरुवात गायिका श्वेतल टावरी यांनी मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया या भक्ती गीताने करून व्यासपीठ व परिसरात भक्तीमय वातावरणाची निर्मिती केली. यानंतर
गायक राजेश हडपी, अभिषेक गडेकर, किरण साळवे आणि श्वेतल टावरी यांनी अनुक्रमे व सामूहिक पद्धतीने अनेक भक्ती गीते गाऊन स्वामी चरणी गायन सेवा अर्पण केली. यामध्ये प्रामुख्याने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, उठा उठा स्वामी समर्था ओवाळीते पंचारती, निघालो घेऊनी दत्ताची पालखी, माझी आई अक्कलकोटी भिऊ नका ती आहे पाठी, द्या तालावर ताल ढोल वाजवा खुशाल आज दत्त जयंती सारे करूया धमाल, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था इत्यादी भक्तीगीते गाऊन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या धर्म संकीर्तन महोत्सवातील भक्ती संगीत सेवेत मान्यवर कलाकारांना
कीबोर्डवर प्रतीक तळपे, बासरीवर अजय सोनवणे, ऑक्टोपॅडवर निखिल कदम, तबलावर प्रसाद मयेकर, ढोलकीवर आदर्श थोरात, ढोलकवर दिपक विनेरकर,
तालवाद्य यज्ञेश आडवलकर आदींनी साथ संगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले तर आभार मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी यांनी मानले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख, प्रथमेश इंगळे, मंदार महाराज पुजारी, ओंकार पाठक, शिवशरण अचलेर, प्रसाद पाटील, दीपक जरीपटके, राजू भोसले, ज्ञानेश्वर भोसले, मोहन शिंदे, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ लोणारी, स्वामीनाथ मुमूडले, विपुल जाधव, मोहन जाधव, सागर गोंडाळ, सुरेखा तेली, नींगूताई हिंडोळे, भीमराव भोसेकर, गणेश दिवाणजी, प्रशांत गुरव, रविराव महिंद्रकर, काशिनाथ इंडे, श्रीकांत मलवे, संजय पवार, प्रसाद सोनार आदिसह अनेक भाविक भक्तांनी उपस्थित राहून या भक्ती संगीत श्रवण सेवेचा लाभ घेतला.

फोटो ओळ – श्री वटवृक्ष मंदिरातील धर्म संकीर्तन महोत्सवात गायन सेवा सादर करताना रमेश हडपी कला मंचचे कलाकार दिसत आहेत.
