बारामती लोकसभा मतदार संघात बंजारा समाजाचा नाराजीचा सुर= अमोल पवार
बारामती मतदारसंघातील राष्ट्रीय बंजारा परिषदेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बारामती लोकसभा मतदार संघात बंजारा समाजाचा नाराजीचा सुर= अमोल पवार

पुणे – राष्ट्रीय बंजारा परिषदचे राष्ट्रीय महासचिव व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड.पंडीतभाऊ राठोड यांनी महाराष्ट्र दौरा करत महायुती चे उमेदवार यांना जाहीर पाठींबा देत आहे.
बारामती लोकसभा मतदार संघाचे महायुतीच्या उमेदवार सौ.सुनेत्राताई पवार यांना पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बंजारा समाजाचे नेते मा. अँड. पंडीतभाऊ राठोड यांनी भेट घेतली आसता सन्मान पूर्वक वागणूक त्यांचा कडून न मिळाल्याने बंजारा समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी बंजारा समाज बांधव नाराज झाले आहे.
बारामती लोकसभा मतदार संघात बंजारा समाजाची मोठी ताकत आसुन अजित दादा पवार यांना जाहीर पाठींबा जर राष्ट्रीय बंजारा परिषदेने दिला नाही तर राष्ट्रवादी शरद पवार गट चे उमेदवार सौ.सुप्रियाताई सुळे यांना फायदा होईल याची काळजी घ्यावी लागेल.
बंजारा समाजातील नेत्यांचा व समाज बांधवांचा सन्मान कराल तरच बंजारा समाज तुम्हाला मतदान करेल नाही तर बंजारा समाज मतदानातून आपली ताकत दाखवेल असे मत अँड. पंडीतभाऊ राठोड यांनी पत्रकार बोलताना व्यक्त केले आहे.
यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे, कार्याध्यक्ष मा.अनिलभाऊ नाईक , प्रदेश उपाध्यक्ष मा.प्रेमकिसन राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश प्रवक्ता मा.अमोलभाऊ पवार,राष्ट्रीय युवा नेते मा.राहुल चव्हाण, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा.सुबोध पवार, कार्याध्यक्ष मा.सुनिल चव्हाण,हाडपसर मतदार संघ अध्यक्ष.मा.रमेश भाऊ राठोड,राष्ट्रीय बंजारा परिषद महाराष्ट्र – कर्नाटका पत्रकार.. मा. संतोषभाऊ राठोड,चद्रकात राठोड= पुणे युवा उद्योजक अक्षय राठोड,प्रकाश राठोड,संघटक मा.आदेश जाधव तथा बारामती मतदारसंघातील राष्ट्रीय बंजारा परिषदेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
