गावगाथा

*नामदेव समाजोन्नती परिषद शाखा पुणे शहर आयोजित पुणे शहरात भव्य वधुवरपालक मेळावा*

वधू वर मेळावा

*नामदेव समाजोन्नती परिषद शाखा पुणे शहर आयोजित पुणे शहरात भव्य वधुवरपालक मेळावा*

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

पुणे:- प्रतिवर्षीचे प्रथेप्रमाणे नामदेव समाजोन्नती परिषद शाखा पुणे शहर आयोजित “समाजाने समाजासाठी घेतलेला उपक्रम” तिसरा राज्य स्तरीय वधुवरपालक मेळावा रविवार दि. २८ मे २०२४ रोजी स्वारगेट बस स्थानकापासून १० मिनिटाच्या अंतरावर पुणे-सातारा रोडवरील वाळवेकर लॉन्स, वाळवेकरनगर, पुणे येथे सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत संपन्न होणार आहे. या मेळाव्यास महाराष्ट्रातून व महाराष्ट्र बाहेरून तसेच परदेशातून बहुसंख्येने वधूवरांची उपस्थिती नोंदवली जाणार आहे.

इच्छूक वधुवरांची नुकतीच नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणी शुल्क रु. ५००.०० असून त्यात वधू/वर व त्यासमवेतचे उभय पालकांना दुपारचे भोजन तसेच सूचीची एक प्रत मोफत असणार आहे. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे वधुवर व्यासपीठावर येऊन आपली ओळख करून देतील व जोडीदाराप्रती अपेक्षा व्यक्त करतील. अपेक्षापूर्ती तथा पसंती पश्चात स्वयं मनोगत व्यक्त करणेसाठी स्वतंत्र हाॅलची व्यवस्था केली असून मोकळेपणा मिळणार आहे ज्यामुळे मनोमिलनास वाव मिळेल.

नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर शाखेने वधूवर मेळाव्यासह बहुजन समाजातील संस्थेकरीता अनेक उपक्रम यशस्वी पणे राबवून सामाजिक बांधिलकी जोपसण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये देवदासी, वासुदेव, गोंधळी, पोतराज यांच्यासह आदिवासी, अंध, अपंग, निराधार, वंचित, मूकबधिर, दगड खान, वृद्धाश्रम, वारकरी अशा बहुजन समाजातील अनेक संस्थांना धान्य वाटप, गरजूंना शिलाई मशीन वाटप, संत नामदेव पुस्तकाचे प्रकाशन व मोफत वाटप, कीर्तन महोत्सव, बहुरूपी भारूड, रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे.

या राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा ऑफ लाइन नोंदणी साठी श्री. विजय कालेकर मो.नं. ९८२२७५१७९६ व ऑन लाइन नोंदणी साठी चिन्मय निमकर मो.नं. ८४४६२५५६६७ यांचेशी संपर्क साधावा अशी माहिती वधूवर मेळाव्याचे आयोजक ना.स.प. पुणे शहराचे अध्यक्ष संदिप लचके यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button