रजत महोत्सवी भेट १९९९ दहावी बॅच चे विद्यार्थी आले एकत्र

रजत महोत्सवी भेट १९९९ दहावी बॅच चे विद्यार्थी आले एकत्र


गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी


कुर्ला गांधी बालमंदिर शाळेतील १९९९ रोजी दहावी पास झालेले विद्यार्थी तब्बल २५ वर्षांनी एकत्र आले व त्यांनी शाळेतच स्नेहमिलानाचा कार्यक्रम ठेवला होता.यावेळी येथून एस एस सी झालेले अनेक मित्र मैत्रिणी आज वेगवेगळ्या अनेक आस्थापना मध्ये उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहेत.आज जवळपास २५ वर्षांनी या सर्वांनी एकत्र येत मस्त धमाल केली..नाच गाणी, कविता, शेरो शायरी, जुन्या नवीन आठवणी एकमेकांशी शेअर करीत कार्यक्रमाचा आनंद घेत आजचा भेटीचा दिवस अविस्मरणीय केला.या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी माजी विद्यार्थी सुधीर लाड, वनिता गंगाधर, सुहास खताते, संदीप मालोंडकर, सचिन कुंभार, प्रफुल्ल शार्दुल या मित्रांच्या मदतीने सर्वांनीच कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.शेवटी विद्यार्थ्यां तर्फे उपस्थित आजी माजी शिक्षकांना आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देण्यात आले. पुढाकार घेतला होता.यापुढेही आपण एकमेकांना असेच भेटत राहू या विश्वासाने राष्ट्रगीत बोलून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
