अक्कलकोट अंबाबाई मंदिर मध्ये देवी महात्म्य परायनाची सांगता…
भक्तीमय आणि उत्साहवर्धक वातावरणात गेल्या तीन दिवसांपासून हा पारायण सोहळा सुरू होता.

अक्कलकोट अंबाबाई मंदिर मध्ये देवी महात्म्य परायनाची सांगता…

अक्कलकोट , दि. २३-
येथील बुधवार पेठेतील श्री अंबाबाई मंदिराच्या सभामंडपात सुरू असलेल्या तीन दिवशीय देवी महात्म्यची सामुदायिक पारायण सोहळ्याची शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. शेकडो भाविकांनी सामुदायिक पारायण केले.

भक्तीमय आणि उत्साहवर्धक वातावरणात गेल्या तीन दिवसांपासून हा पारायण सोहळा सुरू होता.

सदरची पारायणची सुरुवात नगरपरिषदेच्या गर्ल्स स्कुलच्या माजी मुख्याध्यापिका स्वर्गीय शशिकला विश्वनाथ गुरव यांनी दि. ९ आॅक्टोंबर १९८६ मध्ये केवळ ११ महिलांना सोबत घेऊन केली होती.आता महिलांची संख्या वाढली आहे. ही परंपरा गुरव परिवारा कडून गेल्या ३७ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. उज्वला प्रशांत गुरव यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे मुख्य पुजारी अन्नु महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो भाविकांनी श्री देवी महात्म्य ग्रंथाचे सामुदायिक पारायण केले. समारोप कार्यक्रमाला काकडा आरती करण्यात आली. त्यानंतर आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो चा जयजयकार करण्यात आले. सोहळ्याच्या समारोपाला प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर ग्रंथाचे पूजन करण्यात आले.

पारायण सोहळा यशस्वीतेसाठी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बसण्णा कामनुरकर, उपाध्यक्ष बालाजी शापवाले, सचिव शिवाजी कामाठी, मंदिर चे पुजारी नरसिंग बेळ्ळे, उज्ज्वला गुरव,
सरोजिनी पाटील, श्रीदेवी बिराजदार, प्रतिभा नडगिरे, अनिता पाटील,रेणुका डिग्गे, जगदेवी केमबाळ, वैशाली भंडारे, विजयालक्ष्मी कुंभार, सुजाता कामाठी, सुगलाबाई कोळी, शोभा कामनूरकर आदिनी परिश्रम घेतले.
