
अक्कलकोट येथे संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट येथे शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख रवीना राठोड यांच्या वतीने बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.अक्कलकोट शहरातील बस स्थानकासमोर श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
शिवाजीराव सावंत (शिवसेना संपर्क प्रमुख सोलापूर ) अमोल शिंदे (जिल्हा प्रमुख )हरीभाऊ चौगुले
(उपजिल्हा प्रमुख )महेश साठे (संपर्क प्रमुख सोलापूर लोकसभा )प्रा सुर्यकांत कडबगांवकर (विधानसभा संघटक ),अनिता माळगे
(संपर्क प्रमुख सोलापूर महिला आघाडी ), वैशाली हवनूर (जिल्हा संघटक कामगार सेना )
, रविना राठोड (सोलापूर जिल्हा प्रमुख महिला आघाडी ), सामाजिक कार्यकर्ते तम्मा शेळके,उमेश पांढरे (उपतालुकाप्रमुख ) स्वामीनाथ हेगडे ( जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना बांधकाम कामगार सेना )सखाराम राठोड (उद्योगपती )सागर चव्हाण, शशिकांत चव्हाण, अशोक राठोड आदीचीं प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवराच्यां हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शिवाजीराव सावंत , महेश साठे आदीनी मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित मान्यवराचां सत्कार रविना राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. श्री संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त जयंती उत्सव मंडळास माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी भेट देऊन अभिवादन केले. या कार्यक्रमास बंजारा समाज बांधव महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत कडबगावकर यांनी केले.