भाग्यश्री व धनश्री वाटकर यांच्या भक्ती संगीत गायनाने वटवृक्ष मंदिरात दरवळला स्वामी स्मरणाचा सुगंध
भाग्यश्री व धनश्री वाटकर यांच्या भक्ती संगीत श्रवणात श्रोते झाले तल्लीन

भाग्यश्री व धनश्री वाटकर यांच्या भक्ती संगीत गायनाने वटवृक्ष मंदिरात दरवळला स्वामी स्मरणाचा सुगंध

भाग्यश्री व धनश्री वाटकर यांच्या भक्ती संगीत श्रवणात श्रोते झाले तल्लीन

(विशेष शब्द संकलन – श्रीशैल गवंडी)

येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात श्री.स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी निमीत्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील आजचे दुसरे पुष्प अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यातील गायन सेवा सादरकर्ते व नागपूरचे भाग्यश्री व धनश्री वाटकर यांच्या भक्ती संगीत गायन सेवेने गुंफले गेले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवर कलाकारांचा मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेक्रेटरी आत्माराम घाटगे, प्रथमेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे
कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सत्कार केला. या भक्ती संगीत सेवेत गायिका
भाग्यश्री व धनश्री वाटकर यांनी
स्वामी समर्थ तारक मंत्र, नाम स्वामींचे येता माझ्या ठाई रे, अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, जरे सारे सारे स्वामी दर्शनाला, दत्त दर्शनीला जायचं, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, शांत हो श्री गुरु दत्त, माझी रेणुका माऊली, ठुमक चालत रामचंद्र, श्रीरामचंद्र कृपालू भजन, निघालो घेऊन दत्ताची पालखी, माझे माहेर पंढरी
लख्व पडला प्रकाश, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, जेजुरीच्या खंडेराया जागराला या, स्वामींच्या दरबारी जमला भक्तांचा मेळा, माऊली माऊली रुप तुझे,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
माझी आई अक्कलकोटी भिऊ नका ती आहे पाठी, स्वामी कृपा कधी करणार,
भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे,
इत्यादी भक्तीगीते गाऊन उपस्थित श्रोत्यांना आपल्या भक्तीमय स्वराने तल्लीन केले.
या धर्मसंकीर्तन महोत्सवातील भक्ती संगीत सेवेत मान्यवर गायिका भाग्यश्री व धनश्री वाटकर यांना ढोलकीवर अंकित खरारे, ऑक्टोपॅडवर सिद्धार्थ दनाने, सिंथेसाईजरवर अमरीश जहागीरदार, तबल्यावर प्रशांत थोरात, साऊंड सिस्टिमवर संदीप सर्वदे, अनासपुरे इव्हेंटेड मीडिया हाऊस राजू अनासपुरे आदिंनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी तर भावपुर्ण सूत्रसंचालन सोलापूरच्या अरुंधती शेटे यांनी केले. आभार मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी यांनी मानले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख, प्रथमेश इंगळे, मंदार महाराज पुजारी, ओंकार पाठक, शिवशरण अचलेर, प्रसाद पाटील, दीपक जरीपटके, राजू भोसले, ज्ञानेश्वर भोसले, मोहन शिंदे, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ लोणारी, स्वामीनाथ मुमूडले, विपुल जाधव, मोहन जाधव, सागर गोंडाळ, सुरेखा तेली, नींगूताई हिंडोळे, भीमराव भोसेकर, गणेश दिवाणजी, प्रशांत गुरव, रविराव महिंद्रकर, काशिनाथ इंडे, श्रीकांत मलवे, संजय पवार, प्रसाद सोनार आदिसह अनेक भाविक भक्तांनी उपस्थित राहून या भक्ती संगीत श्रवण सेवेचा लाभ घेतला.

फोटो ओळ – श्री वटवृक्ष मंदिरातील धर्म संकीर्तन महोत्सवात नागपूरच्या भाग्यश्री व धनश्री वाटकर व सहकलाकार यांनी गायन सेवा सादर करताना दिसत आहेत.
