गावगाथा

शिक्षिका कल्पना शहा सेवा निवृत्त

सेवानिवृत्ती निमित्त

शिक्षिका कल्पना शहा सेवा निवृत्त

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

अंधेरी एम एम एम गर्ल्स हायस्कूल येथील शिक्षिका आणि सध्या १६६ अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघ कार्यालयात पर्यवेक्षक म्हणून काम पाहणाऱ्या कल्पना शहा नुकत्याच ३१ मार्च रोजी सेवा निवृत्त झाल्या.दिनांक ७ एप्रिल रोजी जोगेश्वरी स्थित इस्माईल युसुफ कॉलेज आवारातील मतदार संघ कार्यालयात त्यांच्या सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी कल्पना यांच्या पतीबरोबर कुटुंबातील इतर अनेकजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते.कार्यालयातील मा. मतदार नोंदणी अधिकारी मा. प्रशाली दिघावकर व सहा. मतदार नोंदणी अधिकारी डॉ. नंदकिशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी राजेश खरात, सतीश मिठबावकर, अविनाश राठोड, रवींद्र गोसावी यांनी नायब तहसीलदार नरेश जागकर यांच्या पुढाकाराने आजच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते. यावेळी कल्पना यांच्या अनेक सहकाऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विचारातून आणि कविता गाणी गाऊन त्यांना भेटवस्तू आणि निवडणूक ऑफिसकडून सन्मानचिन्ह देऊन शुभेच्छा दिल्या.एक कर्तव्यदक्ष,मनमिळावू, प्रेमळ आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका असा त्यांचा नावलौकिक आहे.यावेळी जॉय ऑफ गिविंग संस्थेचे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी त्यांना मेडल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा खास गौरव केला.कार्यक्रमाची सांगता सुग्रास भोजनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान वेळीस यांनी केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button