गावगाथा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गुरुवार पोर्णिमेनिमित्त अन्नछत्र मंडळाचा ९ तास महाप्रसाद सेवेचा विक्रम..!! महाप्रसादाच्या उत्कृष्ठ नियोजनाने स्वामी भक्तांनी समाधान व्यक्त केले.

महाप्रसाद

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गुरुवार पोर्णिमेनिमित्त अन्नछत्र मंडळाचा ९ तास महाप्रसाद सेवेचा विक्रम..!! महाप्रसादाच्या उत्कृष्ठ नियोजनाने स्वामी भक्तांनी समाधान व्यक्त केले.

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*दिगंबरा दिगंबरा…. श्रीपाद वल्लभ दिगंबरा….! श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! श्री अन्नपूर्णा माता की जय..!! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गुरुवार पोर्णिमेनिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून महाप्रसादाच्या उत्कृष्ठ नियोजनाने स्वामी भक्तांनी समाधान व्यक्त केले. लाखो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले.*

दरम्यान न्यासाच्या महाप्रसाद गृहात मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजा, धार्मिक कार्यक्रम भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्रींना नैवेद्य दाखविण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचा संकल्प सोडण्यात आल्यानंतर महाप्रसादास सुरुवात करण्यात आले.

स्वामी भक्तांनी अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या श्री शमी-विघ्नेह गणेश मंदिर, ब्रह्मांडनायक उभी स्वामींची मूर्ती, नियोजित महाप्रसादगृह इमारत, सध्याचे अद्यावत तात्पुरते महाप्रसादालय, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, कार्यरत यात्री निवास-१, यात्रीभुवन-२, अतिथी गृह, आऊटडोअर व इनडोअर जीम, प्रशस्त वाहनतळ, टेकडीवरील श्री समर्थ वाटिका, शिवचरित्र प्रदर्शन हॉल, अग्निशमन, रुग्णवाहिका, आश्रयदाते कक्ष हे सर्व न्यासाचे विविध उपक्रम भक्तांच्या सेवेर्थ सुरु केलेल्या विविध उपक्रम व व्यवस्थेचे स्वागत करुन न्यासाचे कौतुक केले.

दरम्यान वयोवृद्ध, दिव्यांग स्वामी भक्तांना महाप्रसादासाठी थेट सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. याबरोबरच स्वामी भक्तांच्या सेवेर्थ महाप्रसाद घेण्यासाठी सुरु केलेल्या ऑनलाइन बुकिंग योजनेला उत्तम प्रतिसाद देखील मिळाला.

*⭕चौकट :*
*न्यासाकडून महाप्रसादाचे उत्कृष्ठ नियोजन :*
गुरुवार पोर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र अक्कलकोटला आलो असता, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात लाखो स्वामी भक्त महाप्रसादाकरिता आलेले होते. त्याठिकाणी न्यासाकडून महाप्रसादाचे उत्कृष्ठ नियोजन व व्यवस्थापन पाहून माझ्यासह स्वामी भक्तांनी समाधान व्यक्त केले.
*-अर्चना तिके,* कक्ष अधिकारी, गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button