![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240523-WA0056-780x470.jpg)
श्री रामलिंगेश्वर शिक्षण संकुलात बुध्द जयंती साजरी
———————————————
श्री क्षेत्र तीर्थ (ता.द.सोलापूर)दि.२३ मानवी जीवनातील आसक्तीमुळे जीवन निराशामय बनत चालले आहे.सुखाचा शोध घेताना दु:खच वाटेला येत असल्याची अनुभूती येत आहे.सुखाची प्राप्ती करण्यासाठी अपेक्षेचे ओझे बाजूला सारून अत्त दीप भव ही भावना व विचार घेऊन जीवनातील आनंद अनुभवण्यासाठी इतरांच्या दु:खाचा विचार करत मार्गक्रमण केले तर जीवन सुखकारक होईल असे मननीय विचार संत साहित्याचे अभ्यासक प्रा डॉ भीमाशंकर बिराजदार यांनी श्री रामलिंगेश्वर शिक्षण समूह व श्री रामलिंगेश्वर सार्वजनिक वाचनालय श्री क्षेत्र तीर्थ आयोजित भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मांडले
कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन मेणबत्ती प्रज्वलित करून करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना प्रा डॉ भीमाशंकर बिराजदार म्हणाले की,दु:खाचे मूळ मागण्यात आहे.ते नाकारुन आपण इतरांना काही देण्यासाठी कार्य केल्यास आनंदाचे पर्व निर्माण होण्यास वेळ लागणार नाही . त्यासाठी आपण दात्रुत्ववान होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा .संजीवनी तुप्पद-बिराजदार यांनी केले.कार्यक्रमास सौ.शारदादेवी बिराजदार,सौ.विभुते,सौ.आशाताई बाळीकाई,ओम बाळीकाई व परिसरातील नागरिक उपस्थित होते.बुध्द प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)