*👉महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी दौंड व शिरूर तालुक्याचा तक्रार निवारण दिन केडगाव दापोडी येथे साजरा.*
*महा- राज्य विद्युत वितरण कंपनी व ग्राहक कल्याण फाउंडेशन ,दौंड व शिरूर तालुक्याच्या वतीने ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी करण्यात येते. या महिन्यातील तक्रार निवारण दिन काल दि.10/06/2025 रोजी 11:00 वाजता दापोडी ( केडगाव) ता. दौंड येथे साजरा करण्यात आला. मा .कार्यकारी अभियंता श्री. आल्हाट साहेब यांची वरिष्ठ पातळीवर मीटिंग असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता सौ. रश्मी मॅडम.व श्री. टेंगले साहेब यांच्या अधिपत्याखाली व श्री . मारुती पठारे मामा ,श्री. संपत नाना फराटे, श्री. सुनील भाऊ कदम, श्री .अनिल नेवसे, सौ. सविताताई सोनवणे ,श्री. संदीप चव्हाण, श्री स्वप्निल थोरात, श्री. शेलार साहेब, श्री. अमोल दिवेकर, श्री .दादा कडाळे व शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला. पावसाच्या कालखंडामध्ये दौंड व शिरूर तालुक्यातील सर्व डिप्यांची पाहणी करून गरज असेल तिथे कट आउट फ्युज पेटी केबल बदलण्यात यावी . जेणेकरून होणारे अपघात टाळता येतील. असे श्री अनिल नेवसे त्यांनी सुचवले. सर्व तालुक्याचा सर्वे करणे कठीण आहे. जिथे गरज असेल तिथे आम्हाला तुम्ही सांगा त्या आम्ही बदलून देऊ. असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच रेल्वे गेट जवळील मेन विद्युत लाईन अंडरग्राउंड करण्यासंदर्भात विचारणा केली असता संबंधित विभागाला प्रस्ताव दिलेला आहे. असं त्यांनी सांगितले. देऊळगाव गाडा ,ताम्हणवाडी, कुरकुम ,केडगाव ,बोरी व शिरूर तालुक्यातून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचे निराकरण करून घेतले काहींची कामे झाली तर काही पेंडिंग आहे . यानंतर श्री.पठारे मामा व संपत नाना फराटे यांनी कार्यक्रमाची सांगता केली. व सर्वांचे आभार मानले.*
*तरी समस्त तालुक्यातील विद्युत ग्राहकांना विनंती आहे की पावसाच्या कालखंडामध्ये आपल्या डीपी मधील कट आउट पेटी फ्युज किंवा केबल बदलणे गरजेचे असेल तर ती बदलून देण्यात येईल तरी महावितरण शी संपर्क साधावा. लेखी अर्ज द्यावा. अशी आपणास ग्राहक कल्याण फाउंडेशन दौंड तालुक्याच्या वतीने नम्र विनंती.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!