अक्कलकोट येथील प्रामाणिक प्रशांत कुलकर्णी यांनी परत केले रस्त्यावर सापडलेले पैशाने भरलेले पाकीट
अजून हि माणूसकी जिवंत आहे

अक्कलकोट, — येथील मधला मारुती मंदिराजवळ ई महासेवा केंद्र चालविणारे प्रशांत कुलकर्णी हे नेहमीप्रमाणे स्वामी समर्थ मंदिराकडून घराकडे येत असताना त्यांना समर्थ बँकेजवळ रु.15 हजार, आधारकार्ड व पॅन कार्ड असलेले एक पाकिट मिळाले. सदरील व्यक्तीला शोधून ते पाकिट त्यांना सुखरुप परत केल्याने कुलकर्णी यांच्या या प्रमाणिक पणाचे कौतुक व स्वागत होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी फत्तेसिंह चौक येथील समर्थ बँक जवळ रोडवर पडलेले पाकीट कुलकर्णी यांना मिळाले होते. सदरील पाकीटमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड व रोख रक्कम 15 हजार रुपये होते. मग कुलकर्णी यांनी सदरील बाबत सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार मलंग व तुकाराम कदम यांना सांगितले. तुकाराम कदम यांनी डोंबर जवळगे येथील सदरील व्यक्तीला फोन करुन गुरुवारी सकाळी प्रशांत कुलकर्णी यांच्याकडील पाकिट सुखरुप देण्यात आल्याने कुलकर्णी यांच्या या कार्याचे कौतुक व स्वागत होत आहे.
