सोलापूर ग्रामीणचे मावळते पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे स्वामी चरणी नतमस्तक
शिरीष सरदेशपांडे व कुटूंबियांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

सोलापूर ग्रामीणचे मावळते पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे स्वामी चरणी नतमस्तक
(अक्कलकोट, श्रीशैल गवंडी, दिनांक १८/८/२०२४) _ _ _ _ येथील सोलापूर ग्रामीण क्षेत्राचे मावळते पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा कार्यकाल संपल्यानंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्निक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी शिरीष सरदेशपांडे यांचा श्री स्वामी समर्थांचे
कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना शिरीष सरदेशपांडे यांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपणास सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी राहुन पोलीस खात्याची सेवा करण्याची संधी मिळाली. या माध्यमातून स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची व त्यांच्या कृपेची प्रचिती ही मला जाणवली. त्यामुळे जाताजाता सर्वप्रथम येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले व पुढील जीवनाच्या वाटचालीस त्यांचे आशीर्वाद घेतले असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, मनोज इंगोले, शिवशरण अचलेर, श्रीकांत मलवे, विपूल जाधव व भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – शिरीष सरदेशपांडे व कुटूंबियांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
