Akkalkot : तालुक्यातील विविध गावातून होत असलेल्या जलसंधारणा अंतर्गत पाझर, साठवण तलावाच्या पुनर्बांधणी, रुपांतरीत साठवण तलाव या कामांची चौकशी करण्याची मागणी
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट (प्रतिनिधी) : जलसंधारण विभाग हा महत्वाचा असून, याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असला तरी, मलईदार विभागातील ओळखला जातो. याकामांची कार्यप्रणाली अन्य कामापेक्षा वेगळी आहे. या योजने करिता शासनाकडून भरीव निधी दिला जातो. मात्र काम पाहता रोजगार हमी ‘अर्धा तुम्ही, अर्धा आह्मी, अशी असल्याने कोठ्यावधी रुपयाचा निधी जिरवला जात असल्याचा आरोप होताना दिसत आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
जलसंधारण विभागाचे अंमलबजावणी मंत्रालयातून होत असली तरी याचे मुख्य कार्यालय हे संभाजीनगर येथे आहे. सर्वत्र यंत्रणा येतुनच हालते. गावागावातून जलास्तोत्र वाढविण्याची योजना ठेकेदारांना आर्थिक बळ देणारी ठरत असल्याचे बोलले जात आहे. ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने कामे होत असल्याचा आरोप पुढे येत आहे
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित राज्यातील ग्रामीण भागाचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने जलसंधारण विभागाची स्थापना केली. या विभागाकडे जलसंधारण, मृदसंधारण, एकात्मिक पाणलोट विकास लघु सिंचन, पडीक जमीन विकास यासारख्या महत्वपूर्ण केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचे संनियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आलेली असताना शासनाचा उद्देश एक, तर अक्कलकोट तालुक्यात होत आहे भलतेच..! हा प्रकार तालुक्यात पाहायला मिळत आहे. तरी जलसंधारणा अंतर्गत पाझर, साठवण तलावाच्या पुनर्बांधणी, रुपांतरीत साठवण तलाव या कामांची चौकशी करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)