
उद्या सोमवारी वागदरी येथे बसव प्रतिभा पुरस्कार वितरण समारंभ

वागदरी
जागतिक लिंगायत महासभा सोलापूर शाखा वागदरी आयोजित दहावी मधे ९० टक्के व बारावी मध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रथमच ‘बसव प्रतिभा पुरस्कार’ देऊन गौरवण्याचे समारंभ आयोजित केल्याचे माहिती शाखेचे सचिव शांतेश्वर कोठे यांनी सांगितले.
सोमवारी दिनांक 10 जून संध्याकाळी ठीक सहा वाजता बसवेश्वर मंदिराच्य परिसरामध्ये पाऊस आलेतर शिवलींगेशवर मठाच्या सभागृह मधे हा प्रतिभा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
अचलेर विरक्तमठा चे बसव राजेंद्र महास्वामीजी, अक्कलकोट विरक्त मठाचे बसवलिंग महास्वामीजी व वागदरी विरक्त मठाचे श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात व वागदरीचे सरपंच माननीय श्रीकांत भैरामडगी यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. अक्कलकोट चे माननीय गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे साहेब यांचे शुभहस्ते उद्घाटन कार्यक्रम होईल. शेळके प्रशाला चे माजी चेअरमन मा. मल्लिनाथ शेळके, मुख्याध्यापक अनिल देशमुख सर , जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव, परमेश्वर आराधना पंच कमिटीचे अध्यक्ष राजकुमार निंबाळे वीरेंद्र हिंगमिरे सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, साई कन्स्ट्रक्शन वागदरी चे मालक शरणप्पा धरणे सहित अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी आपले सहकुटुंब सहपरिवार सहित व नागरिकांनी उपस्थित राहावे म्हणून जागतिक लिंगायत महासभा वागदरी शाखेचे अध्यक्ष शरणप्पा मांगाणे व उपाध्यक्ष घाळय्या स्वामी यांनी विनंती केली आहे.
