चपळगाव येथे उद्यापासून सी. बी. खेडगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन.
सात दिवस होणाऱ्या या शिबिरात श्रमदानं, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, जनजागृती, पशुचिकित्सा शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनपर व्याख्यान, महिला मेळावा, आरोग्य शिबीर, अंधश्रद्धा निर्मूलन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत

चपळगाव येथे उद्यापासून सी. बी. खेडगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन.

अक्कलकोट – (प्रतिनिधी)


तालुक्यातील चपळगाव येथे सी. बी. खेडगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन बुधवार दिनांक 3 जानेवारी ते मंगळवार दिनांक 8 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत असल्याची माहिती प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट व उपप्राचार्य प्रा. बसवराज चड्चन यांनी दिली. शिबिराचे उदघाट्न गटविकास अधिकारी सचिन खुडे आणि संस्थेचे सेक्रेटरी सुभाष धरणे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी संचालिका तथा माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी या असणार आहेत. यावेळी संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, रविकांत पाटील, ऍड. अनिल मंगरूळे, सरपंच वर्षा भंडारकवठे, राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक प्रा. पोपटराव सांबारे, जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख, वक्ते डॉ. भीमाशंकर बिराजदार उपस्थित राहणार आहेत.

सात दिवस होणाऱ्या या शिबिरात श्रमदानं, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, जनजागृती, पशुचिकित्सा शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनपर व्याख्यान, महिला मेळावा, आरोग्य शिबीर, अंधश्रद्धा निर्मूलन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रकाश सुरवसे यांनी दिली. शिबिराच्या यशस्वी अंमलबजावणी साठी प्रा. श्रीराम चव्हाण, डॉ. सोमनाथ राऊत, प्रा. सिद्धारूढ भैरूनगी, प्रा. दिलीप कांबळे, प्रा. दीपिका दिवटे, प्रा. रत्नमाला उप्पीन, प्रा. स्नेहा हेबळे, प्रा. ललिता लवटे, प्रा. अभिजित कुंभार, प्रा. महेश पाटील, प्रा. आदिलशहा शेख परिश्रम घेत आहेत.
