पंचप्पा कल्याणशेट्टी यांचे कार्य वंदनीय..महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या शिक्षण संकुलनात पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमात मान्यवराकडून गौरवोद्गार
पुण्यतिथी विशेष

पंचप्पा कल्याणशेट्टी यांचे कार्य वंदनीय..महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या शिक्षण संकुलनात पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमात मान्यवराकडून गौरवोद्गार

अक्कलकोट

पंचप्पा कल्याणशेट्टी यांनी सीमावर्ती भागातील बहुजन समाजातील नागरिकांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या भूमिकेतून भरीव योगदान दिले, म्हणून त्यांचे कार्य वंदनीय आहे, असे प्रतिपादन संचालक मल्लिनाथ मसुती यांनी व्यक्त केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था,अक्कलकोट संचलित शिक्षण संकुलातील सर्व शाखांच्या वतीने कै. पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या 9 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, रूपाली शहा, बापूजी निंबाळकर, खंडेराव घाडगे,शिवानंद पुजारी,खिरप्पा गवंडी, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी,दिगंबर जगताप आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी कु.श्रद्धा मोरे, कु. वैष्णवी टपाले,कु सादिया शेख, कु नेहा पवार,कु भाग्यश्री बिराजदार,कु नंदिनी पाटील,कु प्रज्ञा दसाडे या मुलींनी समूहगीत सादर केले.
यावेळी बोलताना शांभवी कल्याणशेट्टी म्हणाले की, महिलांनी शिक्षण घेतले पाहिजे म्हणून अण्णांनी स्त्री शिक्षणास प्राधान्य दिले. बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षण मिळावे म्हणून शाळा महाविद्यालय कार्यान्वित केली. त्यामुळेच विकासाच्या सर्वांगीण वाटा दिसल्या. वंचित उपेक्षित समाजाला न्याय मिळाला. यानंतर कु श्रेया बिराजदार,कु वेदांती मसलेकर,कु संस्कृती जोजन,कु आदिती बाणेगाव या मुलींनीही भाषण केले. यानंतर पुण्यतिथीनिमित्त शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात वृक्षारोपण करणारी मुले-मुली, पावसाचा आनंद घेणारी मुले-मुली, परिसर स्वच्छ करणारी मुले-मुली या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आले. तर लहान गट व मोठा गट याप्रमाणे हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आले. या दोन्ही स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक खंडेराव घाटगे यानी व सूत्रसंचलन कल्पना स्वामी यांनी केले तर आभार सेमी इंग्लिश विभाग प्रमुख दिगंबर जगताप यांनी मानले.

फोटो ओळ
पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मल्लिनाथ मसुती, रूपाली शहा, प्राचार्य डॉ लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी आदी