श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

त्रिपुरारी, कार्तिक पोर्णिमे निमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला 

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दैनंदिन दोन्ही वेळेस मोफत महाप्रसादाची सोय, भक्तांच्या यथाशक्तीच्या देणगीवर सुरू असून २५ हजार दररोज तर सण, वार, उत्सव, दर गुरूवारी, संकष्टी चतुर्थी, एकादशी व सुट्यांच्या दिवशी १ लाखाहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतला.

त्रिपुरारी, कार्तिक पोर्णिमे निमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात विधिवत पूजा-आर्चा, संपन्न झाल्यानंतर लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला 

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! च्या जयघोषात त्रिपुरारी, कार्तिक पोर्णिमे निमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात विधिवत पूजा-आर्चा, संपन्न झाल्यानंतर लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतले.*

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वखाली महाप्रसाद, यात्रीनिवास, यात्रीभूवान यासह विविध उपक्रम हे लाखो स्वामी भक्तांच्या सेवेर्थ सज्ज होती. या पौर्णिमेच्या दिवशी राज्यातील विविध भागातून दिंडी व पालख्या श्रीक्षेत्र अक्कलकोट मध्ये दाखल झाल्या होत्या. यांची सोय देखील न्यासाने केलेली होती.

तीर्थटणातून पर्यटन याबाबत भक्तांकरिता न्यासाच्या परिसरात एकाच छताखाली विविध उपक्रम राबविण्यात आल्याने दत्त मंदिर, स्वामींचा रथ यासह श्रीमंत कांतामतीराजे भोसले वाचनालय, अश्रयदात्यांचे कक्ष, स्वामी सदन- धान्य कोठार, सभागृह, कार्यालय, सिंहांनाधिष्ठ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स्वामींची भव्य उभी ३० फुटी मुर्ती, दिपमाळा, वारूळातून प्रकटले परब्रम्ह, कपिला गाय, शिवस्मारक, श्री गणेश मंदिर इमारत, श्री शमी विघ्नेश गणपती मंदिर, हिरकणी कक्ष, दिव्यांग रुग्णांसाठी बग्गी, आऊटडोअर जीम, यात्री भवन, यात्री निवास, अतिथी निवास, रूग्णवाहिका, अग्निशामक वाहन, एटीएम, श्री स्वामी समर्थ वाटिका व बालो उद्योन, जॉगिंग ट्रॅक, वाहन तळ आदींच्या सोयीमुळे भक्तातून समाधान व्यक्त करण्यात आले. श्रींच्या दर्शनानंतर महाप्रसाद व त्यानंतर परिसरात पर्यटन यामुळे भक्तांची सोय उत्तम रित्या झाली.

*⭕चौकट :*
*न्यासाचे नेटके नियोजन :*
बाहेर गावामधून आलेल्या वाहनांची मैंदर्गी, बसलेगाव, व शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होत होती. हे लक्षात घेऊन न्यासाच्या मैंदर्गी रस्त्यावरील गेटने भाविकांना बाहेर जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आल्याने वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण आल्यामुळे वाहनांची गर्दी कमी झाली. न्यासाने पार्किंगची व्यवस्था चोख केलेली होती. नेहमीच भक्तांना सुविधा देण्यामध्ये न्यास हे अव्वल असून भक्तांना कोणत्याच अडचणी येता कामा नये आशा उपाययोजना व दक्षता घेत असल्याने भक्तांना सुखकर पद्दतीने महाप्रसादाचा लाभ मिळाला.

*⭕चौकट :*
*भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ :*
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दैनंदिन दोन्ही वेळेस मोफत महाप्रसादाची सोय, भक्तांच्या यथाशक्तीच्या देणगीवर सुरू असून २५ हजार दररोज तर सण, वार, उत्सव, दर गुरूवारी, संकष्टी चतुर्थी, एकादशी व सुट्यांच्या दिवशी १ लाखाहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतला.

*⭕चौकट :*
*या राज्यातून भक्त :*
महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गोवा, मध्यप्रदेश, केरळ, तमिळनाडू, गुजरात, दिवदमन, उत्तराखंड, काश्मीर पंडित व दिल्ली याबरोबरच राजस्थान, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यातून लाखो भाविकांनी त्रिपुरारी, कार्तिक पोर्णिमे निमित्त श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे येऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाबरोबरच अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेतेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button