गावगाथा

वटवृक्ष देवस्थान स्वामींची शहरातून गुरुप्रतिपदा उत्सव पारंपरिक पालखी सोहळा संपन्न.

पालखी मिरवणूक शुभारंभ प्रसंगी महेश इंगळे, मंदार महाराज पुजारी व इतर दिसत आहेत.

वटवृक्ष देवस्थान स्वामींची शहरातून गुरुप्रतिपदा उत्सव पारंपरिक पालखी सोहळा संपन्न.

HTML img Tag Simply Easy Learning    

(अक्कलकोट, (श्रीशैल गवंडी)
आज दिनांक २५ फेब्रुवारी रोजी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता
मंदिर समितीचे पुरोहित मोहन गुरुजी, मंदार महाराज यांच्या हस्ते अध्यक्ष महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींची काकड आरती मोठ्या भक्ती भावात संपन्न झाली. यानंतर भाविकांना स्वामी दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. स्वामी भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता स्वामी भक्तांच्या वतीने स्वामींना होणारे अभिषेक आज बंद ठेवण्यात आले होते. सकाळी ८:३० वाजता देवस्थानचे विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, सेक्रेटरी आत्माराम घाटगे यांच्या हस्ते पारंपरिक देवस्थानचे लघुरुद्र करण्यात आले. दुपारी ११:३० वाजता श्रींना महानैवेद्य अर्पण करून भक्त निवास येथे स्वामी भक्ताना भोजन महाप्रसाद देण्यात आले, याचा लाभ हजारो स्वामी भक्तांनी घेतला. आज गुरूप्रतिपदे निमित्त दिवसभरात तालुक्याचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, भारतीय जनता पार्टी मध्य प्रदेशचे पंचायत ग्रामीण विकास आणि कामगार मंत्री प्रल्हादसिंहजी पटेल आदी मान्यवरांसह हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकारिता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी व सेवेकरी प्रयत्नशील होते. सायंकाळी ५ वाजता श्रींच्या सजविलेल्या पालखी सोहळ्याची सुरुवात देवस्थानचे पुजारी मोहन महाराज, मंदार महाराज यांचे हस्ते आरती करून व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे व मा.आमदार सिध्दाराम म्हेत्रेंच्या हस्ते पालखी पूजन करून पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आले. पालखी मिरवणुक फत्तेसिंह चौक, मेन रोड, कारंजा चौक, समाधी मठ, परतीचा मार्ग कारंजा चौक, मौलाली गल्ली, सुभाष गल्ली, मधला मारुती, भारत गल्ली, देशमुख गल्ली, मार्गे वटवृक्ष मंदिरात रात्री साडे नऊ वाजता पालखी मंदिरात आल्यानंतर गुरु भजन होवून उपस्थित सर्व भाविकांना मंदिर समितीच्या वतीने शिरा प्रसाद वाटप करून या गुरूप्रतिपदा उत्सव कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मंदार महाराज पुजारी, महेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, चंद्रकांत गवंडी, शशिकांत लिंबीतोटे, प्रदिप हिंडोळे, शिवशरण अचलेर, मनोज इंगुले,संजय बडवे,
दिपक जरिपटके, अमर पाटील, प्रसन्न हत्ते, रामचंद्र समाणे, सागर गोंडाळ, गिरीश पवार, प्रसाद सोनार, महेश काटकर, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, श्रीशैल गवंडी, ऋषिकेश लोणारी, संतोष जमगे, लखन सुरवसे, दादा सावंत, नागनाथ जेऊरे, अनिल हवले, आदींसह देवस्थानचे सेवेकरी व अनेक स्वामीभक्त उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ = पालखी मिरवणूक शुभारंभ प्रसंगी महेश इंगळे, मंदार महाराज पुजारी व इतर दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button