गावगाथा

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी, कन्नड व उर्दू शाळा आळगे येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.

शाळा प्रवेश २०२४

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी, कन्नड व उर्दू शाळा आळगे येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रांरभी नवागत विदार्थांची सजवलेली ट्रॅक्टरमधून गावात मिरवणूक काढण्यात आली.
प्रभात फेरी शाळेत परत आल्यावर सर्वप्रथम नवागत बालकांचे औक्षण करण्यात आले, सभेला सुरुवात झाली. अध्यक्ष म्हणून श्री गड्डेप्पा कोरे( एस एम सी अध्यक्ष) उपाध्यक्ष म्हणून श्री संतोष कुमार चराटे( एस एम सी उपअध्यक्ष) प्रमुख पाहुणे म्हणून महातेंश हतुरे ( सरपंच) सलीम पाटील ( उर्दू एस एम सी अध्यक्ष) गुरुशांत माळगे, औदुसिद्ध पुजारी, मलकारी पुजारी यांची निवड करण्यात आली.
गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री शरणप्पा माळगे सावकार यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमा पुजन नतंर उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. नवागत बालकांचा डोक्यावर शंकु आकाराचा टोपी घालुन, प्रत्येकाला गुलाब पुष्प देऊन, गुलाब फाकळ्यांचा वर्षाव उपस्थित मान्यवरांनी केले.
प्रास्तविक मध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री अखलाख शेख सर यांनी आजच्या युगातील आहवाने, शिक्षण पद्धती, भारतीय संस्कृति याबदल सविस्तर माहिती देऊन शुभेच्छ दिल्या. इ १ ते ७ च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले . गावचे सरपंच महातेंश हत्तुरे यांनी जिल्हा परिषद शाळांची शिक्षकांची गुणवता, खाजगी व इंग्रजी मध्यामाचे शाळा पेक्षा सर्वोतम असते , आपल्या गावातील मुले गावातच शाळेतच दाखल होऊन गावात शिकले पाहिजे, असे आहावान केले.
यावेळी उर्दु शाळेचे मुख्याध्यापक पटेल मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री गड्डेप्पा कोरे( एस एम सी अध्यक्ष) यांनी शिक्षक- पालक – शाळा यांच्या सुसंवादातून उच्चा गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार व्हावेत, संपन्न राष्ट्रासाठी शिक्षक व शिक्षणांची भूमिका फार महत्वाची आहे. असे सांगून , विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट जोशपूर्ण सुत्रसंचालन श्री शिवशंकर हत्तुरे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन विषय शिक्षक गिरीश कोरे सर यांनी मानले. आजच्या पहिला दिवसी शालेय पोषण आहार शिरा मसाला भात अस केला होता.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कन्नड शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रभुलिंग मेळकुंदे सर, ज्येष्ठ शिक्षण गुरुनाथ बिराजदार, श्री निंगणा कोळी सर, शिवानंद कोळी सर, सकलेस्वर पुजारी, सर, कुमठे मॅडम, शाळा पो अहारचे कर्माचारी श्रीमती शारदा कोटगी, रेहाना कुमठे. पिंटु टाकळे, विद्यार्थी मिरवणुकीसाठी श्री विश्वानाथ दिंडोरे यांनी टॅक्टर उपलब्ध करून दिली.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button