कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात शाळेच्या पहिल्या दिवशी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत..
इ.5 वी ते 8 वी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240616-WA0063-780x470.jpg)
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात शाळेच्या पहिल्या दिवशी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत..
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट: महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालयात शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी शाळेचा पहिला दिवस म्हणून संस्थेचे संस्थापक कै. पंचप्पा कल्याणशेट्टी व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक मराठी, कन्नड व सेमी इंग्रजी माध्यमाच्या सर्व मुलांना संचालिका सौ शांभवी कल्याणशेट्टी व सीईओ रूपाली शहा यांनी औक्षण केले. त्यानंतर गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तद्नंतर विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात व आनंदात शाळेत प्रवेश केला. यावेळी शासनाकडून आलेले पाठ्यपुस्तक सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका सौ शांभवी कल्याणशेट्टी, शिक्षण विभाग प्रमुख सौ रूपाली शहा, ज्युनिअर कॉलेज प्रमुख पूनम कोकळगी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, सेमी विभाग प्रमुख दिगंबर जगताप आदी मराठी, कन्नड, सेमी विभागाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
चौकटीतील मजकूर
शाळेचा पहिला दिवस म्हणून संपूर्ण शाळा सजवले होते. गेटवर सुंदर रांगोळी, दर्शनी भागात रंगीबेरंगी फुगे लावले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आनंद दिसून आला. शेवटी इ.5 वी ते 8 वी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)