Akkalkot : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या “न्यासा” चा उपजिल्हाधिकारी राजेंद्र शेळके यांच्याकडून कौतुक

अक्कलकोट : (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून सुरु असलेले अन्नछत्र अतिशय सुंदर उपक्रम असून, योग्य नियोजन, स्वच्छता व भक्तीभाव जपून चालविला जात असल्याचे मनोगत विठ्ठलरुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

त्यांच्या समवेत पंढरपूर विठ्ठलरुक्मिणी देवस्थान समितीचे सुशीलकुमार ढेकळे-पाटील, अमित नवाळे, वैभव पोतदार, नारायणराव वाघ हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, सौरभ मोरे, शहाजीबापू यादव, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, दत्ता माने, बलभीम पवार, बाळासाहेब पोळ, बाळासाहेब घाटगे, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
