स्वामी दर्शनासह भाविकांनी महेश इंगळेंच्या जीवन कार्याची प्रेरणाही घ्यावी – पो.म.नि. शारदा राऊत
अप्पर पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

स्वामी दर्शनासह भाविकांनी महेश इंगळेंच्या जीवन कार्याची प्रेरणाही घ्यावी – पो.म.नि. शारदा राऊत
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१२/११/२४) –

मानवी जन्माचे सार समजल्यानंतर जीवनाचे मूल्यमापन काय आहे त्याचा अर्थ आपणास उलगडतं, त्यामुळे मन भक्ती, परमार्थ, त्याग, समर्पण या गोष्टींकडे वळते. या सर्व व्याख्या येथील मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या व्यक्तिमत्वात आपणास नेहमीच निदर्शनास येतात. सेवा, परमार्थ या कार्यातून महेश इंगळे यांनी आपल्या परमार्थिक जीवनाचे ध्येय सार जोपासले आहे, म्हणून त्यांचे जीवन कार्य म्हणजे समर्पित जीवन कार्याचे प्रेरणास्त्रोत आहे. ते स्वामी दर्शना बरोबरच भाविकांना जीवन उपदेशकही आहे, म्हणून येथील वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आलेल्या स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाबरोबरच मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या समर्पित जीवन कार्याची प्रेरणा घ्यावी असे
मनोगत मुंबईचे अप्पर पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले व मनोभावे स्वामींची आरती केली. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी शारदा राऊत यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी शारदा राऊत बोलत होत्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, भाजपा जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नन्नु कोरबू, सोनू बाबा नाईकवाडी, शकील नाईकवाडी, नाविद डांगे, सलीम शेख, अनिफ कोरबू आदींसह मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, महेश काटकर आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – अप्पर पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
