अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या धार्मिक कार्याबरोबरच सामाजीक कार्यात न्यास अग्रेसर — माजी मंत्री बबनराव घोलप
न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या धार्मिक कार्याबरोबरच सामाजीक कार्यात न्यास अग्रेसर — माजी मंत्री बबनराव घोलप

अक्कलकोट : (प्रतिनिधी)

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या धार्मिक कार्याबरोबरच सामाजीक कार्यात न्यास अग्रेसर असल्याचे मनोगत माजी मंत्री बबनराव घोलप यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

त्यांच्या समवेत नंदकुमार गोसावी, संजय शिंदे, सुधाकर टेकळे, गणेश तुपसमुद्रे, आनंद खजुर्गीकर, योगेश कबाडे हे उपस्थित होते.

यावेळी, न्यासाचे सतीश महिंद्रकर, सिद्धाराम कल्याणी, गोरखनाथ माळी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, नामा भोसले, दत्ता माने, शरद भोसले, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, अनिल बिराजदार,चंद्रकांत हिबारे, संभाजीराव पवार, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, लाला निंबाळकर, कल्याण देशमुख यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.