गावगाथाग्रामीण घडामोडी

Jeur : श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या वतीने जेऊर गाव आणि परिसरात २०० वड पिंपळाचे रोपण

सोलापूर (प्रतिनिधी): येथील श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे सिद्धार्थ सर्जे व पदाधिकारी यांच्या वतीने जेऊर ता. अक्कलकोट येथील श्री काशीविश्वेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला यास 100 वड आणि 100 पिंपळाची रोपे जेऊर आणि परिसरातील सर्व वाडी, वस्ती आणि शाळांमध्ये मैदानात लावण्यासाठी देण्यात आली आहेत.

त्याचा प्रारंभ वटपौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ फाउंडेशनचे सिद्धेश्वर सर्जे,यशवंत हिरापुरे,सिद्धाराम आलूरे,मीना गायकवाड,स्मृती सर्जेसह सर्व पदाधिकारी आणि श्री काशीविश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री मल्लिकार्जुन पाटील व अन्य मान्यवर आणि शिक्षक बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. यासाठी जेऊर येथील सामाजिक कार्यकर्ते व वृक्षप्रेमी तरुण, प्रगतिशील शेतकरी बसवराज बोरीकरजगी यांच्या अथक प्रयत्नातून आणि सततच्या पाठपुराव्यातून सदर रोपे मिळालेले आहेत.

आता उर्वरित सर्व रोपांची लागवड जेऊर परिसरातील सर्व वस्ती शाळा,आणि शेजारील सर्व गावातील मागणी करतील त्या माध्यमिक व प्राथमिक शाळांना मैदानावर लावण्यासाठी रोपे देण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज जेऊर येथील धनगर वस्ती शाळा येथे 14 रोपे लावण्यात आले. यावेळी उपसरपंच काशिनाथ पाटील,केंद्रप्रमुख कृष्णात मोरे सर,राजकुमार अमोगी सर , दामोदर सुतार सर, बाबुराव गुरव,शिक्षक समितीचे शंकर अजगुंडे सर,आंबाराया कनोजी,राजकुमार कणमुसे, शांतप्पा शिंगे सर,श्री प्रकाश नन्नवरे सर, सहशिक्षक काशिनाथ मेत्रे,सहशिक्षक शांतकुमार ढंगे संजय गुरव,काशिनाथ कळवंत सर यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.या वस्ती शाळेच्या प्रशस्त मैदानावर ही 14 वड आणि पिंपळची रोपे येत्या काळात बहरल्यास परिसरातील पर्यावरणाचे रूप आणखी मनमोहक आणि निसर्ग सौंदर्य पूर्ण होणार आहे.आजपर्यंत गव्हाणे वस्ती शाळा, अंदेवाडी प्राथमिक शाळा, बसवराज हायस्कूल करजगी यांना वड व पिंपळ रोपे लावण्यासाठी काशिविश्वेश्वर प्रशालेच्या संयोजनातून देण्यात आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button