
जॉय ऑफ गिविंग संस्थेचे आदिवासी मुलांना किराणा किट वाटप…

पूनम पाटगावे, मुंबई प्रतिनिधी…

जॉय ऑफ गिविंग संस्थेचे आदिवासी मुलांना किराणा किट वाटप…पूनम पाटगावे, मुंबई प्रतिनिधी…मुंबई महाराष्ट्रातील सामाजिक शैक्षणिक संस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या जॉय सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच फिल्मसिटी गोरेगाव पूर्व येथे डोअर स्टेप स्कूल चे वतीने त्यांच्या बस मध्ये रस्त्यावरील मुलांसाठी शाळा भरविण्यात येते.या मुलांचे पालक नवघनी कामगार, खेळणी विकणारे, रोजंदारीवर काम करणारे असे आहेत.फार तुटपुंज्या पगारावर यांचे काम चालते.तेव्हा अशावेळी त्यांना शिक्षण बरोबरच खाण्यासाठी सकस आहार पुरविणे अत्यावश्यक असून यासाठी जॉय चे वतीने साठ विद्यार्थ्याना किराणा किट देण्यात आले.यावेळी किट वाटप करण्यासाठी छाया राणे, शीलाताई येरागी, असुंता डिसोजा, मीना भुतकर, चंद्रशेखर सावंत, एकनाथ खानविलकर, गजानन पाटील, मनोहर कुंभेजकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.जॉय ने आतापर्यंत हजारो कुटुंबांना किराणा देऊन त्यांची भूक भागविण्याचा छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे अध्यक्ष गणेश हिरवे म्हणाले आणि पुढं देखील आमचे हे कार्य असेच सुरूच राहणार असल्याचे सांगितले.यावेळी या उपक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

